मुला- मुलींना अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध, कॅफेवर पोलिसांचे छापे, तीन जणांवर गुन्हे दाखल
Breaking News | Ahmednagar: छोटे कंपार्टमेंट तयार करून मुला- मुलींना अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या विना परवाना कॅफेवर तोफखाना पोलिसांनी रविवारी छापे टाकले.
अहिल्यानगर : सावेडी उपनगरातील छोटे कंपार्टमेंट तयार करून मुला- मुलींना अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या विना परवाना कॅफेवर तोफखाना पोलिसांनी रविवारी छापे टाकले. याप्रकरणी तिघा जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सावेडी उपनगरातील ताठे मळा येथील गोल्डस्टार कॅफेचा मालक ऑकार कैलास ताठे (वय २३, रा. ताठेनगर, सावेडी), पाईपलाईन रोडवरील श्रीराम चौकातील बर्ड कॅफेचा मालक ऋषीकेश सखाराम निर्मळ (वय २४, रा. झोपडी कॅन्टीन), हंगरेला कॅफे चालक ओमकार दत्तात्रय कोठुळे (वय २५, रा. भुतकरवाडी, नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
सावेडी उपनगरातील पाईपलाईन रोड, ताठे मळा परिसरात विना परवाना कॅफे सुरू आहेत, अशी माहिती तोफखाना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांना मिळाली. त्या आधारे तोफखाना पोलिसांच्या पथकाने ताठे मळा येथील गोल्डस्टार कॅफेवर छापा टाकला असता तिथे छोटे छोटे कंपार्टमेंट तयार करून मुला मुलींना बसण्यासाठी व्यवस्था केलेली असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे या कॅफेमध्ये कॉफी तयार करण्यासाठी लागणारी कॉफी, साखर आदी साहित्यही उपलब्ध नव्हते. तसेच कोणताही परवाना न घेता हा प्रकार सुरू होता. दुसऱ्या कारवाईत पोलिसांनी ताठे मळा येथील बर्ड कॅफेवर छापा टाकला. तिथे पडदे टाकून जागा उपलब्ध केल्याचे आढळून आले. तिसरी कारवाई हंगरेला कॅफेवर करण्यात आली असून, याप्रकरणी कॅफे मालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक कोकरे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने केली.
Web Title: Places available for boys and girls to perform obscene chala, police raids
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study