Home अहिल्यानगर अहिल्यानगर: पेट्रोल टँकर पलटी; पेट्रोल भरण्यासाठी गर्दी

अहिल्यानगर: पेट्रोल टँकर पलटी; पेट्रोल भरण्यासाठी गर्दी

Breaking News | Ahilyanagar Crime:  टँकरचे ब्रेक फेल झाल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून टँकर पलटी झाल्याची घटना.

Petrol tanker overturns rush to fill petrol

पाथर्डी:  वीस हजार लिटर पेट्रोल घेऊन जाणार्‍या टँकरचे ब्रेक फेल झाल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून टँकर पलटी झाल्याची घटना कल्याण-निर्मळ महामार्गावर मंगळवारी (दि.15) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास करंजी घाटात घडली. तीव्र तापमान असताना पलटी झालेल्या टँकरमधून इंधनाची गळती सुरू झाल्याने एकच खळबळ उडाली.

टँकर चालक गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी नगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशमन गाडी घटनास्थळी दाखल झाली. पेट्रोलचा टँकर बाजूला घेतल्यानंतर इंधन गळती थांबवली. रस्त्यावर पाणी मारून रस्ता वाहन चालकांसाठी खुला करण्यात आला. मुंबईकडून परभणीला वीस हजार लिटर पेट्रोल घेऊन जाणारा टँकर माणिकशहा पीरबाबा दर्गाजवळ धोकादायक वळणावर उलटला.

रस्त्यावर पलटी झालेल्या टँकरमधून पेट्रोल गळती सुरू झाली होती. अगोदरच कडक उन्हामुळे तापमानात मोठी वाढ झाली आहे तर दुसरीकडे टँकरमधून पेट्रोलची गळती होत होती. पेट्रोल अत्यंत ज्वलनशील असल्यामुळे आग लागण्याची शक्यता होती त्यामुळे येणारी-जाणारी वाहतूक थांबविण्यात आली होती. दोन तास घाटातील वाहतूक ठप्प झाली होती. प्रवाशांनी टँकरमधील गळती होत असलेले पेट्रोल पाण्याच्या मोकळ्या बाटल्या, दुधाचे कॅन, प्लास्टिकचे ड्रममध्ये भरून नेण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्यांना रोखले.

पोलीस उपनिरीक्षक हरिश भोये, हरिभाऊ दळवी, भगवान टकले यांच्यासह राज्य मार्ग पोलीस विभागाचे पीएसआय राठोड, सहाय्यक फौजदार काळे, हेडकॉन्स्टेबल देविदास खेडकर, भडांगे, दरे, टेकाळे यांनी अपघातग्रस्त टँकर बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली. करंजी येथील शिवा मोरे, शिशीर ओहळ, सचिन शिदोरे, पांडू पवार, शुभम मुटकुळे, किरण अकोलकर, अभि अकोलकर, सुरज अकोलकर, सागर कराळे, महादेव शिंदे, कानिफनाथ शिंदे, अमोल शिंदे, गणेश शिंदे यांनी प्रशासनाला मदत केली.

Web Title: Petrol tanker overturns rush to fill petrol

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here