Home महाराष्ट्र पेट्रोल दरवाढीचा सपाटा सुरूच, ८ रुपयांनी महागले पेट्रोल

पेट्रोल दरवाढीचा सपाटा सुरूच, ८ रुपयांनी महागले पेट्रोल

Petrol Diseal Rate Price previous 13 day

नवी दिल्ली | Petrol Diseal Rate Price: मागील १३ दिवसांपासून पेट्रोल दरवाढीचा सपाटा सुरूच आहे. गेल्या १३ दिवसांत तब्बल ८ रुपयांनी पेट्रोलची दरवाढ झाली आहे.  सातत्याने होणारी दरवाढ नागरिकांच्या मनगटावर बसत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील कच्च्या तेलाचे भाव गगनाला भिडलेले असताना भारतातील पेट्रोलियम कंपन्यांनी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केलेली आहे. पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ सुरुच असून, गेल्या तेरा दिवसातील ही अकरावी दरवाढ आहे.

पेट्रोलियम कंपन्यांनी गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर इंधन दरात वाढ केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ८० पैशांनी वाढ केली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी २२ मार्चपासून इंधन दरवाढीचा सपाटा सुरु केला आहे. गेल्या १३ दिवसांत पेट्रोल ८ रुपयांनी महाग झाले आहे. महाराष्ट्र पेट्रोल ११७.८८ आणि डिझेल १००.६१

Web Title: Petrol Diseal Rate Price previous 13 day

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here