Home Accident News दुचाकी व टँकर यांच्या समोरासमोर अपघातात एक जण ठार

दुचाकी व टँकर यांच्या समोरासमोर अपघातात एक जण ठार

person was killed in a head-on Accident between a two-wheeler and a tanker

राहुरी | Accident: राहुरी कारखाना येथील डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या पेट्रोल पंपावर दुचाकी व टँकर यांच्यात समोरासमोर धडक बसल्याने दुचाकीस्वार हा उपचार सुरु असताना मृत्यु झाल्याची घटना घडली आहे.

या अपघातात दुचाकीस्वार बापू आसाराम साळुंखे मयत झाले आहेत. हा अपघात डॉ. तनपुरे कारखाना पेट्रोल पंपाच्या परिसरात दुपारी एक वाजता झाला.

याबाबत अधिक माहिती अशी की, राहुरी कारखाना येथील डॉ. तनपुरे सहकारी सहकारी कारखान्याच्या पेट्रोल पंपावर दुचाकीस्वार बापू आसाराम साळुंखे हे आपल्या टी. व्ही. एस.स्टार या गाडीत पेट्रोल टाकून निघाले असता तिथेच डिझेल खाली करण्यासाठी आलेला टँकर यांच्या समोरासमोर जोराची धडक बसली. धडक दिल्याने बापू साळुंखे हे गंभीर जखमी झाले.

त्यांना प्राथमिक उपचारासाठी विवेकानंद नर्सिंग होम मध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र पुढील उपचारासाठी नगर येथे नेत असताना उपचारा अगोदरच त्यांचा मृत्यु झाला. टँकर चालक हा राहुरी पोलीस ठाण्यात हजर झाला असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. मयत बापू साळुंके हे साई आदर्श मल्टीस्टेट संस्थेत नोकरी करत होते. दत्तात्रय साळुंके यांचे ते बंधू होते.

Web Title: person was killed in a head-on Accident between a two-wheeler and a tanker

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here