खळबळजनक, सुसाइड नोटमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांची नावे लिहून एकाची आत्महत्या
Suicide News: आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नाशिकमध्ये भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल, नाशिकच्या राजकीय वर्तुळात खळबळ.
नाशिक: आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नाशिकमध्ये भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे आणि कामगार आघाडीचे पदाधिकारी विक्रम नागरे यांच्या नावाचा उल्लेख आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आढळून आला आहे. या घटनेने नाशिकच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
नाशिकमध्ये एका गुन्ह्यात संशयित असलेल्या आरोपीने घोटी येथील भरवीरमध्ये आत्महत्या केली आहे. अनिरुद्ध धोंडू शिंदे, असं आत्महत्या केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत भाजप नगरसेवक मुकेश शहाणे आणि कामगार आघाडी पदाधिकारी विक्रम नागरे यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. वरील दोघांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली आहे. संशयित आरोपी गुन्हा दाखल झाल्यापासून नाशिकमधून फरार होता. मागच्या काही दिवसांपूर्वी माजी नगरसेविकेचे पुत्र भाजप कामगार आघाडीचे पदाधिकारी विक्रम नागरे यांच्या घरावर हल्ला झाला होता. या हल्ल्यात सहभागी असल्याच्या संशयावरून हल्ला करून खंडणी मागितल्या प्रकरणी अनिरुद्ध शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल होता.
दरम्यान, अनिरुद्ध शिंदे यांनी चिठ्ठी लिहून आत्महत्या केल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. अनिरुद्ध शिंदे यांच्या कुटुंबीयांनी व नातेवाइकांनी चिठ्ठीत उल्लेख असलेल्या दोघांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी घोटी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला होता. रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात हा गोंधळ सुरू होता. जमावास पांगवण्यासाठी पोलीसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. त्यानंतर रात्री उशिरा भाजपचे पदाधिकारी मुकेश शहाणे आणि विक्रम नागरे या दोघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी घोटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Business Idea | पाच हजार रुपयांच्या गुंतवणुकीत कमवा बक्कळ पैसा | Earn Money from Business
चिठ्ठीत:
मी अनिरुद्ध धोंडू शिंदे, मी आत्महत्या करण्याचं कारण मी विक्रम नागरे व मुकेश शहाणे यांच्या त्रासाला कंटाळून व वारंवार मला धमकी व जन्मठेप लावण्याचा प्रयत्न करून मला व जीवाला धोका निर्माण करून माझ्यावर मोक्का अंतर्गत कार्यवाही करण्यात आली. या सगळ्या खोट्या गुन्ह्यामुळे माझ्या परिवारकडे लक्ष देऊ शकत नाही, म्हणून मी जीव देण्याचा निर्णय घेतला आहे. असेच माझ्या व माझ्या मित्रांना व त्यांच्या कुटुंबाला भयंकर त्रास होत आहे व होतोय. त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी, कारण हा माझ्या आयुष्यातला शेवटचा क्षण आहे.
Web Title: person committed suicide by writing the names of BJP officials in the suicide note
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App