Home Accident News संगमनेर: ट्रॅक्टरच्या धडकेत पादचारी जखमी, गुन्हा दाखल

संगमनेर: ट्रॅक्टरच्या धडकेत पादचारी जखमी, गुन्हा दाखल

Pedestrian injured in tractor collision Accident in Sangamner 

संगमनेर | Accident News:  वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने धडक दिल्याने पादचारी जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास गुंजाळवाडी फाट्याजवळ घडली.

रमेश धोंडीबा काळे वय ४२ रा. कासारवाडी मंगळवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास गुंजाळवाडी फाट्याजवळून पायी जात असताना वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने त्यांना धडक दिली. या अपघातात रमेश काळे हे जखमी झाले. या अपघातनंतर चालक पसार झाला. याबाबत काळे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी रावसाहेब बाळासाहेब खातोडे वय ४२ रा. कसारा दुमाला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल टोपले हे करीत आहे.

ब्रेकिंग: अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग अपडेट वाचण्यासाठी  संगमनेर अकोले न्यूज नवीन सुपर फास्ट स्वरूपात आजच आपला  अॅप येथून अपडेट करा.   संगमनेर अकोले न्यूज 

Web Title: Pedestrian injured in tractor collision Accident in Sangamner 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here