Pawar against Vikhe in Nagar Dakshin Lok Sabha Election: अहमदनगर दक्षिण मतदारसंघात सुजय विखे-पाटील यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसकडून (शरद पवार गट) आमदार रोहित पवारांना उतरवले जाण्याची शक्यता.
अहमदनगर | नवी दिल्ली : लोकसभा निवडणुका महायुती आणि महाविकास आघाडीसाठी महत्त्वाच्या असणार आहेत. प्रत्येक जागा महत्त्वाची आहे. अशातच अहमदनगर दक्षिण मतदारसंघात सुजय विखे-पाटील यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसकडून (शरद पवार गट) आमदार रोहित पवारांना उतरवले जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
रोहित पवारांचा कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ अहमदनगर जिल्ह्यातच येतो. शरद पवारांचा दांडगा जनसंपर्क या भागात आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात याच जिल्ह्यातून येतात. त्यामुळे सुजय विखे यांच्याविरुद्ध रोहित पवार हे उमेदवार असण्याची शक्यता आहे. विखेंना पराभूत करण्यासाठी त्यांचे परंपरागत राजकीय विरोधक असलेले थोरात पूर्ण ताकद लावतील, तर भाजपसह अजित पवार गटाला शह देण्यासाठी शरद पवार पूर्ण ताकद लावतील. त्यामुळे अहमदनगर दक्षिण मतदारसंघात लोकसभा निवडणूक सुजय विखेविरुद्ध रोहित पवार यांच्यात होण्याची शक्यता आहे, असे समजते.
Web Title: Pawar against Vikhe in Nagar Dakshin Lok Sabha Election
See also: Breaking News live, Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, Crime News