नात्याला काळिमा: पोटच्या लेकीवर वडिलांनीच केला अत्याचार, मुलीची आपबिती
Crime News: जन्म दिलेल्या वडिलांनीच पोटच्या मुलीवर दोन वर्षे अत्याचार (abused) केल्याचे घटनेने संताप.
छत्रपती संभाजीनगर: पोटच्या लेकीवर वडिलांनीच अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगर शहरात समोर आला आहे. जन्म दिलेल्या वडिलांनीच पोटच्या मुलीवर दोन वर्षे अत्याचार केल्याचे घटनेने संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे पीडित मुलीने आईला वारंवार सांगून देखील तिने याकडे भीतीपोटी दुर्लक्ष केले. त्यामुळे अखेर मुलीने शुक्रवारी (9 जून) स्वतः पोलीस ठाणे गाठत पोलिसांना आपबिती सांगितली. त्यानंतर सिडको पोलिसांनी तात्काळ यात गुन्हा दाखल करुन वडिलांना अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, उच्चशिक्षणाची स्वप्न पाहणारी 14 वर्षीय पीडित मुलगी कुटुंबातली मोठी मुलगी आहे. तिला एक लहान बहीण असून आई गर्भवती आहे. मात्र दोन वर्षांपूर्वी म्हणजे पीडित मुलगी 12 वर्षांची असतानाच वडिलांनी तिच्यावर अत्याचार सुरु केले. मुलीने आईला हा प्रकार सांगितला, पण याचा कोणताही फायदा झाला नाही. तर घाबरलेल्या मुलीवर वडिलांनी पुढे किळसवाणे प्रकार केले. सातत्याने वाईट हेतूने स्पर्श करणे, न आवडणारी कामे सांगणे सुरु केले. वयानुसार समज यायला लागलेल्या मुलीने मात्र नंतर त्याला विरोध सुरु केला. त्यामुळे या नराधम बापाने तिला बेदम मारहाण केली.
दोन दिवसांपूर्वी पीडित मुलगी घरात एकटीच असताना पुन्हा वडिलांची तिच्यावर वाईट नजर गेली. त्याने थेट तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. तिने पुन्हा आईला सांगितले. मात्र, गर्भवती असलेल्या आईने पुन्हा तिलाच शांत केले. मात्र आता तिची सहनशक्ती संपली होती. शुक्रवारी सकाळी 11 वाजता ती याला त्याला विचारत सिडको पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचली. मात्र, ती ठाण्यापासून काही अंतरावर दोन तास रडत बसली. महिला पोलीस चहा प्यायला जात असताना त्यांना ही मुलगी दिसली. तिला त्यांनी तात्काळ ठाण्यात नेत पोलीस निरीक्षक संभाजी पवार, सहाय्यक निरीक्षक श्रद्धा वायदंडे यांच्यासमोर नेत आपबिती सांगितली. त्यानंतर हा किळसवाणा प्रकार समोर आला. तर पीडित मुलीची आपबिती ऐकून पोलिसांच्याही डोळ्यात अश्रू आले.
Web Title: Pat’s daughter was abused by her father, the girl harrashed
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App