बिबट्याचा शेतात महिलेवर अचानक हल्ला, महिला जखमी
पाथर्डी: पाथर्डी तालुक्यात बिबट्याचे हल्ल्याचे प्रकार सुरूच आहे. मागील २० दिवसांत ३ बिबटे पकडण्यात वनविभागाला यश आले आहे.
शनिवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास खरवंडी कासार परिसरातील भगवानगड लमाण तांड्यावर शेतात काम करणाऱ्या एका महिलेवर बिबट्याने हल्ला केला आहे. या हल्ल्यात महिला जखमी झाली आहे.
छबुबाई एकनाथ राठोड वय ४५ रा. भगवानगड लमाण तांडा असे या महिलेचे नाव आहे. तिच्यावर खरवंडी कासार येथे एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
छबुबाई व तिचे पती हे दोघे जण भगवानगड लमाण तांडा परिसरात त्यांच्या शेतात काम करत असताना दुपारी चार वाजेच्या सुमारास बिबट्याने शेतात काम करत असलेल्या भगवानगड छबुबाई यांच्यावर अचानक हल्ला केला. त्यांच्या चेहऱ्यावर पंजा मारला. हा प्रकार त्यांच्या पतीच्या लक्षात आला. त्यांनी लगेचच बिबट्याच्या दिशेने दगडाचा मारा सुरु केला. तो बाजूला होत नसल्याने त्याच्या तोंडावर काठीने फटका मारला. त्यांच्या आरडाओरडाने गावातील तरुण गोळा झाले. जखमी झालेल्या छबुबाई यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Web Title: Pathardi Bibtya suddenly attacks a woman in a field
कडाक्याच्या थंडीत करा विजेची बचत, पैशाची बचत, आजच बसवा सोलर वॉटर हिटर, नामांकित कंपनीचे (V-Guard, Supreme) सोलर वॉटर हिटर मिळण्याचे एकमेव ठिकाण आर.पी.डी. एनर्जी. संगमनेर, दिवाळीनिमित्त खास ऑफर्स सुरु. संपर्क: 9850540436