एसटी बस वाहकावर प्रवाशाचा शस्त्राने वार; गुन्हा दाखल
Breaking News | Ahmednagar: त्याने वाहक व चालकाला मारहाण करून शस्त्राने वार करून जखमी.
नेवासा: नेवासा ते नेवासाफाटा दरम्यान नाशिक पाथर्डी बसच्या चालकाने गाडीत झोपून राहिलेल्या प्रवाशास नेवासा मागे गेले आहे. उतरुन घ्या, असे म्हटल्याचा राग आल्याने त्याने वाहक व चालकाला मारहाण करून शस्त्राने वार करून जखमी केले. याबाबत दाखल फिर्यादीवरुन नेवासा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर सरकारी कामात अडथळा व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत एसटी वाहक देवदत्त शरदराव अंदुरे (वय ३६) रा. खरवंडी कासार, ता. पाथर्डी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, २८ मे रोजी नाशिक ते पाथर्डी ही बस पाथर्डीकडे घेऊन येत असताना तिकीटाचे हिशोबापेक्षा एक इसम गाडीमध्ये अधिक असल्याचे मला समजल्याने मी सर्व प्रवाशांना विचारपूस करत असताना, एक इसम झोपलेला होता. त्यास उठवून तिकिट विचारले असता त्याचे तिकीट हे नेवासा पर्यंतचे होते. त्यास आम्ही नेवासा पाठीमागे गेले आहे. तुम्ही उतरून दुसऱ्या गाडीने पुन्हा माघारी जा असे सांगितले असता त्याने शिवीगाळ केली व बसच्या खाली न उतरता मला धक्काबुक्की करून
दमदाटी करू लागला. त्यावेळी चालक पांडुरंग ज्ञानदेव काळे हेही पाठीमागे बसमध्ये आले. तेव्हा त्यांना देखील त्या अनोळखी इसमाने शिवीगाळ दमदाटी केली व त्यास मी खाली उतरवत असताना त्याने त्याचे हातातील लालसर रंगाचे काहीतरी धारदार हत्याराने माझे डोक्यात, कपाळाच्या वर जोरात फटका मारून मला जखमी केले. या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीवर गुन्हा रजिस्टर नंबर ५१५/२०२४ भारतीय दंड संहिता कलम ३५३, ३३२, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Passenger stabs ST bus conductor Filed a case
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study