संगमनेर: वनरक्षक पदाची लेखी परीक्षा उत्तीर्ण, शारीरिक सराव करताना तरुणीचा मृत्यू
Breaking News | Sangamner: शारीरिक चाचणीसाठी मैदानावर धावण्याचा सराव करत असताना २७ वर्षीय विवाहित तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना.
संगमनेर : वनरक्षक पदाची लेखी परीक्षा होऊन उत्तीर्ण झालेल्या शारीरिक चाचणीसाठी मैदानावर धावण्याचा सराव करत असताना २७ वर्षीय विवाहित तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना गुंजाळवाडी ग्रामपंचायत हद्दीतील गोल्डन सिटी परिसरातील मैदानावर घडली. ही घटना शुक्रवारी (दि.१६) सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली.
मनीषा दीपक कढणे (रा. चंदनापुरी, ता. संगमनेर) असे मयत विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वनरक्षक पदाकरिता भरती निघाली होती. त्यांनी त्यासाठी अर्ज केला होता. त्या शहरातील एका अकादमीत प्रशिक्षण घेत होत्या. वनरक्षक पदाची लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी शारीरिक चाचणीसाठी पात्र होण्याकरिता मैदानावर नियमित सराव सुरू होता. काही दिवसांनी शारीरिक चाचणी होणार असल्याने त्या मेहनत घेत होत्या. नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी त्या मैदानावर आल्या. सराव करत असताना त्यांनी दोन राउंड मारले. ९ वाजेच्या समारास त्यांना त्रास होऊ लागल्याने त्या खाली बसल्या, त्यांची दातखीळ बसली. त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले, मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता कुटीर रुग्णालयात नेण्यात आला. दुपारी एक वाजेच्या सुमारास चंदनापुरी गावातील अमरधाममध्ये त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे अकस्मात निधन झाल्याने अनेकांनी शोक व्यक्त केला. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
Web Title: Passed the written exam for the post of forest guard, girl dies during physical exercise
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study