जमिनीच्या वादातून महिला सरपंचाना कुऱ्हाडीने मारहाण, तुफान हाणामारी
पारनेर | Parner: रविवारी पारनेर तालुक्यातील बाबुर्डी येथे जमिनीच्या वादातून दोन कुटुंबात तुफान हाणामारी झाली. या हाणामारीत कुऱ्हाडी, काठ्यांचा वापर करण्यात आला. सुभाष दिवटे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पारनेर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
याप्रकरणी सुभाष दिवटे यांनी सुपा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रविवार १५ रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास आशा दिवटे यांनी बांधावरील झाड का पेटवून दिले असे विचारले असता सहा जणांनी गैरकायद्याची माणसे जमवून फिर्यादी, सुभाष दिवटे, सासू ठकुबाई दिवटे यांना कुऱ्हाडीने व काठ्यांनी मारहाण केली. तसेच लाथाबुक्या, शिवीगाळ व दमदाटी करण्यात आली.
बाबुर्डी येथील गवळी व दिवटे यांच्या बऱ्याच दिवसांपासून जमिनीचा वाद आहे. पंचकमिटी समोर हा वाद बऱ्याच वेळा ठेवण्यात आला मात्र वाद मिटू शकला नाही. त्यामुळे रविवारी तुफान हाणामारी झाली.
याप्रकरणी बाळू विठोबा गवळी, संगीता बाळू गवळी, निलेश बाळू गवळी, महेश बाळू गवळी, रीना महेश गवळी, प्रियांका निलेश गवळी सर्व रा. बाबुर्डी ता. पारनेर यांच्याविरोधात मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीची दखल न घेतल्यास जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेणार आहेत. आशा दिवटे, माजी सरपंच बाबुर्डी
Web Title: Parner Women sarpanch beaten with ax over land dispute
कडाक्याच्या थंडीत करा विजेची बचत, पैशाची बचत, आजच बसवा सोलर वॉटर हिटर, नामांकित कंपनीचे (V-Guard, Supreme) सोलर वॉटर हिटर मिळण्याचे एकमेव ठिकाण आर.पी.डी. एनर्जी. संगमनेर, दिवाळीनिमित्त खास ऑफर्स सुरु. संपर्क: 9850540436