Home अहमदनगर मक्याच्या शेतात चोर लपले, महिला पकडायला गेली अन

मक्याच्या शेतात चोर लपले, महिला पकडायला गेली अन

Parner Thieves hid in corn fields

पारनेर | Parner: मक्याच्या शेतामध्ये चोर लपून बसले होते. यातील दोन चोरट्यांना ग्रामस्थांनी पकडण्याचा प्रयत्न केला यात एक जण पकडला तर एका महिलेने दुसऱ्या चोराला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र तो निसटून गेला.

याबाबत अधिक माहिती अशी की, देसवडे गावात गोनिंद कानडे यांच्या शेतात एक संशयास्पद दुचाकी आढळून आली. तेथे ग्रामस्थांनी पाळत ठेवली. रात्री आठ वाजेच्या सुमारास दोघे चोरटे ती दुचाकी शेतातून बाहेर रस्त्यावर घेऊन आले. ती चालू करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यांच्या हालचाली संशयास्पद असल्याने ग्रामस्थांनी चौकशी केली तेव्हा ते चोर असल्याचे लक्षात आले. दुचाकी त्यांनी लपून ठेवली होती. त्यावर संगीता भोर रामा गुंड यांनी चोरट्यास पकडले. हे पाहून इतर नागरिक त्यांच्या मदतीला धावून आले. तोपर्यंत संगीता भोर यांच्या पोटात ठोसा मारून पळून गेला. त्याचा पाठलाग केला मात्र तो निसटून गेला. अंधाराचा फायदा घेत तो फरार झाला. एक आरोपी पोपट नाथू भूताम्बरे रा. शिंदेवाडी ता. संगमनेर याला पकडून ठेवण्यात यश आले. तेथील ग्रामस्थांनी त्याला चांगलाच चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. या ग्रामस्थांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. एकूण चार जणांची टोळी असल्याची माहिती मिळाली. पळून गेलेल्या आरोपीचे नाव पिंटू दुधावडे आहे. चोरीची दुचाकी विकण्यासाठी तेथे आणल्याचे सांगितले. तसेच शेतकऱ्यांचे वीज पंप चोरीचे गुन्हे या टोळीने केले आहे.  

Web Title: Parner Thieves hid in corn fields

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here