खुनाचा उलगडा झाला: मुलानेच पित्याचा खून करून मृतदेह नदीपात्रात फेकला
अहमदनगर | Parner : निघोज ता. पारनेर येथील कुकडी नदीपात्रात २७ ऑगस्ट रोजी धान्याच्या कोठीत अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. याबाबत टाकळीहाजी येथील माजी सरपंच दामू घोडे यांनी पारनेर पोलिसांत माहिती दिली होती.
या मृतदेहाची ओळख पटली असून मुलानेच मित्राच्या मदतीने आपल्या पित्याचा खून केल्याचे उघडकीस आले आहे असे जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी सांगितले आहे.
या प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखा व पारनेर पोलीस यांनी तपास सुरु केला. ११ सप्टेंबरला मयताच्या वर्णनाशी मिळते जुळते मिसिंग तक्रार पारनेर पोलिसांना महिती झाली. पोलिसांनी याबाबत माहिती घेतली असता मिसिंग व्यक्ती हि सतीश सदाशिव कोकडे असल्याचे समोर आले. त्यांनतर पोलिसांनी सतीश यांच्या नातेवाईक यांच्याशी संपर्क केला. त्यांनी त्यांना कपडे, धागे, मृतदेह फोटो दाखविले तेव्हा मयत हे सतीश कोकडे असल्याचे नातेवाईककानी सांगितले. पोलिसांनी मयताचा मुलगा यांच्याकडे चौकशी केली असता त्याच्यावर संशय आला. त्यामुळे पोलिसांनी अधिक कसून चौकशी केली असता मुलानेच मित्रासमवेत वडिलांचा खून केल्याची कबुली दिली.
मयत सतीश कोकडे याचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते. तो तिच्यावर पैसा खर्च करीत असे. पत्नीलाही मारहाण करत असे. या कारणावरून मायलेकांत यांच्यात अनेकदा वाद होत होते. या कारणातून २३ ऑगस्ट रोजी मित्राच्या मदतीने डोळ्यात मिरची पूड टाकून, गळा आवळून खून केला. नंतर मृतदेह कुकडी नदीपात्रात नेऊन टाकला. तसेच मयताची कार शिरूर तालुक्यातील करडे घाटात खाली दरीत ढकलून दिली. अशी कबुली पोलिसांकडे दिली आहे.
See: Latest Entertainment News, Latest Marathi News, and Latest Marathi News Live
Web Title: Parner Son killed his father and threw his body in the river