पोलिसाने केली लाचेची मागणी, पोलिसास अटक
पारनेर | Parner: पारनेर तालुक्यातील धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तक्रार नोंदवून घेण्यासाठी पोलिसाने ५ हजार रुपयांची मागणी केली. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या पोलिसाला अटक केली आहे.
शंकर गुलाब रोकडे असे या पोल्लीसाचे नाव आहे. रोकडे हा पारनेर पोलीस ठाण्यात हवालदार या पदावर कार्यरत आहे.
पारनेर पोलीस ठाण्यात एका गुन्ह्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल होणार होत्या. तुमच्याविरुद्ध तक्रार दाखल झाली असून तुम्हाला जर त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करायची असेल तर ५ हजार रुपये द्यावे लागतील असे अशी हवालदार रोकडे यांनी पैशाची मागणी केली. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार या पथकाने लाच मागणीची पडताळणी केली आणि ४ फेब्रुवारीला रोकडे विरोधात पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे, उप अधीक्षक हरीश खेडकर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
Web Title: Parner Police demand bribe police arrest