नदीत वाहून गेलेल्या ग्रामसेवकाचा मृतदेह तब्बल १२ तासांनी सापडला
पारनेर | Parner: सोमवारी पारनेर, मुंगशी, लोणी हवेली, हंगे परिसरात ढगफुटी सदृश्य जोरदार पाउस झाल्याने हंगा नदीला बऱ्याच वर्षानंतर मोठा पूर आला आहे.
हंगा नदीला आलेल्या पुरात सोमवारी सायंकाळी मुंगशी येथील ग्रामसेवक दत्तात्रय दिनकर थोरात वाहून गेले होते. त्यांचा मृतदेह आज मंगळवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास तब्बल १२ तासांनी आढळून आला आहे.
सोमवारी सायंकाळी हंगे येथून दुचाकीवरून घरी जात असताना मुंगशी येथे जात असताना सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास पाण्यातून जात असताना पाण्याचा अंदाज न आल्याने दुचाकीसह वाहून गेले होते. दुचाकी एका झुडपाला जवळच अडकली मात्र थोरात हे दूरवर वाहत गेले होते. पुलावरून दत्तात्रय थोरात दुचाकीसह वाहून गेले होते.
सुमारे एक किलोमीटर अंतरावर त्यांचा मृतदेह आढळून आला. स्थानिक तरुणांच्या सहायाने पोलिसांनी शोध मोहीम हाती घेतली. या मोहिमेत थोरात यांचा मृतदेह एका झुडपाला अडकलेल्या स्वरूपात आढळून आला.
See: Latest Entertainment News, Latest Marathi News, and Latest Marathi News Live
Web Title: Parner body of the gram Sevak was found 12 hours later