शेततळ्यात पोहायला गेलेल्या १३ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू
पारनेर | Parner: पारनेर तालुक्यात रांजणगाव मशीद येथे सोमवारी दुपारी शेततळ्यात पोहायला गेलेल्या १३ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे राहुल रामदास जवक असे या मुलाचे नाव आहे. राहुलला पोहता येत नसल्याने ही दुर्दैवी घटना घडली आहे.
शेततळे हे जवळपास २ परसाचे आहे. राहुल हा सहावीच्या इयत्तेत शिकत होता. राहुल बुडत असताना त्याला वाचविण्यासाठी गेलेल्या त्याचा चुलत भाऊ वाचला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
राहुल बुडत असताना त्याचा चुलत भाऊ ऋतिक सतीश जावक याने आरडाओरडा केला. त्याला वाचविण्यासाठी शेततळ्यात उडी मारली. आजूबाजूच्या नागरिकांनी त्या दोघांना शेततळ्यातून बाहेर काढले मात्र राहुल हा मृत्यू झाला होता. तर ऋतिक याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, and Latest Marathi News
Web Title: Parner 13-year-old boy drowned while swimming in a field