Home अहमदनगर अहमदनगर हादरले! भूकंपसदृश्य धक्के बसल्याने घबराट

अहमदनगर हादरले! भूकंपसदृश्य धक्के बसल्याने घबराट

Breaking News | Ahmednagar :  जमिनीला हादरे बसले. त्यामुळे घरांचे पत्रे, खिडक्या वाजल्या. या घटनेने सोशल मीडियावर भूकंपसदृश धक्के ( earthquake) जाणवल्याची चर्चा, गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.

Panic due to earthquake-like tremors

श्रीरामपूर: श्रीरामपूर, राहुरी, राहाता तसेच नगर तालुक्यातील काही भागात काल मंगळवारी जमिनीला हादरे बसले. त्यामुळे घरांचे पत्रे, खिडक्या वाजल्या. या घटनेने सोशल मीडियावर भूकंपसदृश धक्के जाणवल्याची चर्चा रंगली होती.घरातील पत्रे, पंखे, खिडक्यांसह अन्य वस्तूंना जोरदार हादरा बसल्याने या गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत मात्र प्रशासनाकडून दुजोरा मिळू शकला नाही.

अहमदनगर जिल्ह्यातील काही तालुक्यात जमिनीला हादरे बसले. जिल्ह्यातील श्रीरामपूर, राहुरी, राहाता, नगर तालुक्यातील काही गावात हे हादरे जाणवले. काल मंगळवारी ही घटना घडली. या धक्क्यांमुळे घरांचे पत्रे, खिडक्या खळखळल्या. दरम्यान यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पाहायला मिळाले. भूकंपसदृश धक्के जाणवल्याची चर्चा सोशल मीडियावर दिवसभर रंगलेली पाहायला मिळाली.

श्रीरामपूर शहरातील काही भाग तसेच तालुक्याच्या मातापूर, बेलापूर, पढेगाव सह अन्य परिसरात काल पहाटे तसेच सकाळी दहा ते साडेदहाच्या दरम्यान भूगर्भातून भूकंपासारखे धक्के जाणवल्याने नागरिकात घबराट निर्माण झाली.

टिळकनगर परिसरासह रांजणखोल, दत्तनगर, एकलहरे या परिसरात काल सकाळी १० च्या दरम्यान व रात्रीच्या ९ व १० च्या सुमारास धक्के जाणवले. त्यामुळे घरातील पत्रे, पंखे, खिडक्यांसह अन्य वस्तूंना जोरदार हादरा बसल्याचे येथील नागरिक सांगतात.

राहुरी शहरासह तालुक्यात वांबोरी तसेच अन्य भागातही हादरे बसले. राहाता तालुक्यातही लोणी, बाभळेश्वर व अन्य काही ठिकाणी हादरे जाणवल्याचे सांगण्यात आले. नगर तालुक्यातील काही भागात हे हादरे जाणवले. केडगाव, सोनेवाडी आदी भागात खिडक्या, पत्रे खळखळले होते असे नागरिक सांगतात. सायंकाळी जात प्रमाणात हे जाणवले असेही ग्रामस्थ सांगतात. दरम्यान के के रेंजमध्ये सराव सुरू असल्याने हे धक्के जाणवत असल्याचा अंदाज नागरिक बांधत आहेत. दरम्यान नागरिकांतून सध्या काल बसलेल्या हादऱ्यांमुळे अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. हे धक्के कसले होते याचा खुलासा प्रशासनाने करावा जेणेकरुन जनतेतील संभ्रम दूर होईल अशी मागणी नागरिक करत आहेत.

Web Title: Panic due to earthquake-like tremors

See also: Breaking News live,  Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation StudyCrime News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here