लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पल्लवी बांडेचे सुयश, सर्वोदय विद्यालयात सत्कार
Rajur News: राज्य कर निरीक्षक आणि सहायक कक्ष अधिकारी वर्ग २ (Public Service Commission Exam) अशी एकाच वेळी दोन्ही पदांवर पल्लवी बांडेची निवड.
राजूर: अकोले तालुक्यातील राजूर येथील पल्लवी नामदेव बांडे हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तुंग यश संपादन केले आहे. पल्लवीने राज्य कर निरीक्षक आणि सहायक कक्ष अधिकारी वर्ग २ अशी एकाच वेळी दोन्ही पदांवर तिची निवड झाली आहे. तिच्या या यशामुळे गुरुवर्य रा. वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयात माजी उप प्राचार्य सतीश गुजराथी, एस.एस. पाबळकर, उप प्राचार्य ताजणे बी. एन. व सर्व शिक्षकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पल्लवी बांडे हिने २०१३ साली सर्वोदय कनिष्ठ महाविद्यालयात सायन्स विभागातून प्रथम क्रमांक मिळविला होता.
पल्लवी बांडे हिने या यशोगाथाची माहिती देताना तिच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. राजूर वनविभागाच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या पहिल्याच प्रयत्नात मी उत्तीर्ण झाले. मुख्य परीक्षेतही यश मिळाले, मात्र मुलाखतीत अपयश आले आणि मी माघारी फिरले. एवढा अभ्यास करूनही माझ्या पदरी अपयश आले. निराश झाले मात्र त्याचवेळी आई-वडिलांनी मायेचा हात पाठीवर फिरवत कौतुक करत उभारी दिली. त्यांच्या आशावादी होता. शब्दांची खूणगाठ जपत पुन्हा एकदा अभ्यास सुरू केला आणि नुकत्याच लागलेल्या निकालात एकाच नव्हे तर दोन परीक्षांत यश मिळवले.
लहानपणापासून पल्लवी नामदेव बांडे हिला वाचनाची आवड होती. आई वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करावयाच्या असा चंग आम्हा बहिणींनी बांधला. आई-वडिलांनी उभारी दिली. अपयशाने न खचता अभ्यास केला आणि पल्लवीने दुहेरी यश मिळविले.
विद्यापीठाच्या ग्रंथालयात बारा-बारा तास अभ्यास केला. कुठलेही क्लास केले नाही. सिनिअर मित्रांचे मार्गदर्शन घेत गेले आणि आई-वडिलांची इच्छा पूर्ण करायची हे स्वप्न साकार करण्यासाठी परिश्रम घेतले याचे फळही मिळाले असे मत तिने विद्यार्थ्यांसमोर व्यक्त केले.
अकोले तालुक्यातील कोंदणी या गावी पल्लवीचा जन्म झाला. वडील प्राथमिक शिक्षक तर आई गृहिणी. राहुरी मधील कृषी महाविद्यालयात एमएस्सी ॲग्री करत असताना तिने लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा अभ्यास सुरू केला होता. पल्लवीच्या यशामागे तिच्या आई, वडील, शिक्षक या सर्वांचा खूप मोलाचा वाटा आहे.
Business Idea | शेतीसंबंधित हा व्यवसाय सुरु करून दर दिवस हजारोंची कमाई करण्याची संधी
काहीजण परिस्थितीचे कारण सांगून शिक्षणापासून पळ काढत आहेत. पल्लवी स्वतः आदिवासी समाजातील आहे. आदिवासी भागातील मुलांमध्ये प्रचंड मेहनत करण्याची क्षमता आहे; परंतु ते परिश्रम घेत नाहीत याची खंत पल्लवी व्यक्त करते. एखाद्या अपयशाने खचून जाऊ नका असा सल्ला देत भविष्यात आदिवासी भागात स्पर्धा परीक्षाबद्दल जनजागृती करण्याचा पल्लवीने आशावाद व्यक्त केला. या कार्यक्रमप्रसंगी माजी उप प्राचार्य सतीश गुजराथी, एस.एस. पाबळकर, उप प्राचार्य ताजणे बी. एन. व सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
Web Title: Pallavi Bande’s success in Public Service Commission Exam, Sarvodaya Vidyalaya felicitated
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App