महागाईचा भडका! घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ
Domestic LPG Cylinder Price 14.2 kg prices increased by Rs 50/. Domestic LPG cylinder price increased to Rs 1103/ in Delhi
LPG Cylinder Price : आधीच महागाईच्या भडक्यात होरपळून निघालेल्या सर्वसामान्य नागरिकांची चिंता वाढली आहे कारण मार्च महिना सुरू होताच पुन्हा एकदा महागाईचा भडका उडाला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी मार्च महिन्याच्या पहिल्याच तारखेला गॅस सिलिंडरच्या नवीन किमती जाहीर केल्या आहेत. त्यानुसार घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.
भारतीय इंधन कंपन्यांनी जारी केलेल्या नव्या दरानुसार, १ मार्चपासून घरगुती गॅस सिलिंडरचे (Cylinder) दर ५० रुपयांनी वाढवण्यात आले आहे. याशिवाय १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरातही तब्बल ३५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. आधीच महागाईच्या भडक्यात होरपळून निघालेल्या सर्वसामान्यांना बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे.
सरकारी तेल कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घरगुती गॅस सिलिंडरचे दर ५० रुपयांनी वाढवण्यात आल्याने मुंबईत १४.२ किलोच्या घरगुती सिलिंडरची किंमत आता १ हजार १०२ इतकी झाली आहे. बुधवारी सकाळपासून घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ झाल्याने शहरातील लाखो ग्राहकांवर खर्चाचा बोजा वाढला आहे.
Web Title: Outbreak of inflation Big hike in domestic gas cylinder price
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App