संगमनेर: विखेंच्या सभेला गेल्याच्या रागातून घरात घुसून मारहाण
Sangamner Assembly Election 2024: डॉ. सुजय विखे यांच्या सभेला गेल्याच्या रागातून निमोण येथील सरपंच संदीप देशमुख व त्यांच्या मातोश्रींना मारहाण करून दागिने व रोख रक्कम हिसकावून नेल्याची घटना.
संगमनेर : तालुक्यातील धांदरफळ येथे डॉ. सुजय विखे यांच्या सभेला गेल्याच्या रागातून निमोण येथील सरपंच संदीप देशमुख व त्यांच्या मातोश्रींना मारहाण करून दागिने व रोख रक्कम हिसकावून नेल्याची घटना शुक्रवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास तालुक्यातील निमोण येथे घडली.
याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, निमोणचे सरपंच संदीप देशमुख हे धांदरफळ येथे माजी खा. डॉ. सुजय विखे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या सभेला हजर होते. याचा राग मनात धरून जमावाने हातात लाठ्या काठ्या, चाकू घेवून सरपंच देशमुख यांच्या घरात घुसून त्यांची आई लताबाई भास्कर देशमुख (वय ६६) यांना मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. त्यांच्या गळ्यातील पाच तोळ्याचा राणी हार, डोरले व रोख १० हजार बळजबरीने हिसकावून घेऊन गेले. जखमी लताबाई यांना तातडीने घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत लताबाई भास्कर देशमुख यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली
. त्या फिर्यादीवरून पोलिसांनी शाबीर तांबोळी, जुबेद तांबोळी, शेखर घुगे, सुयोग सांगळे, शफिक हमीद, मुस्ताकीम तांबोळी, गोरक्ष घुगे, इस्ताक पठाण, नद्दीम पठाण, अनिल घुगे, फैजान अत्तार, अशा ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे करीत आहे.
Web Title: Out of anger for going to Vikhe’s meeting, Assembly Election 2024
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study