अकोले: आढळा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या एकाचा बुडून मृत्यू
Akole News: केळी येथील वीट भट्टीवर काम करणाऱ्या ३७ वर्षीय इसमाचा आढळा नदीत बुडून (drowned) मृत्यू झाल्याची घटना.
अकोले: तालुक्यातील केळी येथील वीट भट्टीवर काम करणाऱ्या ३७ वर्षीय इसमाचा आढळा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली.
आढळा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दत्तू मोरे याचा दम तुटल्याने पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दत्तू लक्षमण मोरे असे या व्यक्तीचे नाव आहे. केळी गावातील स्थानिक नागरिक व गोताखोर दोन तासांपासून नदीत शोध घेत असून अंधार पडल्याने शोधकार्यात अडथळा निर्माण झाल्याने शोधकाम थांबविण्यात आले आहे. केळी गावाचे पोलीस पाटील जनार्दन बिन्नर यांनी माहिती दिली आहे. आज तीन वाजण्याच्या सुमारास आढळा नदीच्या कडेला वीट भट्टीवरील कामगार दत्तू मोरे हे पोहण्यासाठी आढळा नदीत उतरले एक ते दोन वेळा पोहत नदी पारही केली मात्र पुन्हा नदी पार करीत असताना दम तुटल्याने पाण्यात बुडाले. ही सर्व घटना दत्तू मोरे यांच्या कुटुंबातील सदस्यांनी पाहिली आरडाओरडा करून वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. अंधार पडल्याने शोधकार्यात अडथळा निर्माण झाल्याने शोधकाम थांबविण्यात आले आहे. अकोले पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.
Web Title: One who went swimming in Adha river drowned
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App