Home अहमदनगर अहिल्यानगर: 3 लाख 84 हजाराच्या रोकडसह एकाला पकडले

अहिल्यानगर: 3 लाख 84 हजाराच्या रोकडसह एकाला पकडले

Breaking News | Ahmednagar: निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यावर दुसऱ्याच दिवशी कोतवाली पोलिसांनी नगर शहरात एका व्यक्तीला मोठ्या रकमेसह (Cash) ताब्यात घेतले.

One was caught with cash of 3 lakh 84 thousand

अहिल्यानगर: विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यावर दुसऱ्याच दिवशी कोतवाली पोलिसांनी नगर शहरात एका व्यक्तीला मोठ्या रकमेसह ताब्यात घेतले आहे. अमरधाम परिसरात काल, बुधवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, ही रोकड नेमकी कशाची आहे, याची ठोस माहिती न देऊ शकल्याने कोतवाली पोलिसांनी आचारसंहितेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पुढील कारवाई सुरू केली आहे.

बुधवारी रात्री अमरधाम परिसरात राहुल आदिनाथ शेरकर (वय ४४, रा. माळीवाडा, अहिल्यानगर) याला कोतवाली पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडे ३ लाख ८४ हजार ३०० रुपये रोकड आढळून आली. आचारसंहिता काळात ५० हजारांपेक्षा अधिक रक्कम बाळगण्यावर निर्बंध आहेत. सदर रक्कम कशाची आहे, कोठून आणली आहे, निवडणुकीशी याचा काही संबंध आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, संबंधित व्यक्तीला रकमेबाबत ठोस माहिती न देता आल्याने पोलिसांनी ही रक्कम ताब्यात घेतली आहे. आचारसंहितेच्या अनुषंगाने पुढील कारवाई केली जात असल्याचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी सांगितले.

Web Title: One was caught with cash of 3 lakh 84 thousand

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here