Home राहाता शिर्डीत पाठलाग करत गावठी कट्ट्यासह एकास अटक

शिर्डीत पाठलाग करत गावठी कट्ट्यासह एकास अटक

Breaking News | Shirdi Crime: शिडॉत गावठी कट्ट्यासह एकास अटक.

One was arrested along with Gavathi Kattya while chasing in Shirdi

शिर्डी : शिडॉत गावठी कट्ट्यासह एकास अटक करण्यात आली आहे. शिर्डी शहरातील अवैध व्यवसाय आणि वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी गुन्हे अन्वेषण विभाग व शिडी पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली आहे. जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवली जात आहे.

शिर्डी पोलिसांनी गावठी कट्टे बाळगणाऱ्या आणि तडीपार गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, शिडीतील हॉटेल राजे, कनकुरी रोड येथे एक तरुण गावठी कद्वयासह उभा असून, तो विक्रीच्या तयारीत आहे. १४ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी सापळा रचून अमोल दिवे (वय २४, रा. गोवर्धन नगर, शिडर्डी) याला पाठलाग करून अटक केली. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून गावठी पिस्तूल (किंमत ५०,०००) १५०० रुपये किमतीचे जिवंत काडतूस, २०,००० रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण ७०,००० चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अमोल दिवे याची चौकशी केली असता, त्याने श्रीरामपूर येथील फरार आरोपी मुजम्मिल बागवान याच्याकडून हे हत्यार खरेदी करून विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली, अमोल दिवे विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर १५८/२०२५, भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५, ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, त्याच्यावर यापूर्वीही शिर्डी आणि राहाता पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबमें, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमणे, पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली तुषार धाकराव, मनोहर गोसावी, फुरकान शेख, बाळासाहेब नागरगोजे, बाळासाहेब गुंजाळ, प्रमोद जाधव, अमृत आढाव, प्रशांत राठोड, रमिज राजा अत्तार, महादेव भांड यांनी केली. शिर्डी शहरातील अवैध शस्र व्यवसायावर कारवाई करताना पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे.

Web Title: One was arrested along with Gavathi Kattya while chasing in Shirdi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here