अहमदनगर: नाल्यात मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ
Ahmednagar | Kopargaon: नाल्यात ४० वर्षीय इसमाचा मृतदेह (Dead body) आढळून आल्याने खळबळ.
कोपरगाव: कोपरगाव शहरातील मध्यवर्ती भागात बैलबाजारजवळ नाल्यात ४० वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. यावेळी नागरिकांनी गर्दी केली होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, कोपरगाव शहरातील बैल बाजार नजीक असलेल्या नाल्यात आज सकाळच्या सुमारास एक ४० इसमाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
सदरच्या इसमाचे नाव संजय छबु कोपरे असल्याचे समजते. तो शहरातील टाकळी नाका येथील रहिवासी असून तो गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होता. सर्वत्र शोध घेतल्यावर सापडत नसल्याने अखेर त्यांच्या कुटुंबियांनी शहर पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती.
दरम्यान सदर मृतदेहाबाबत माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करत सदर मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. सदर इसमाचा मृत्यू कसा झाला हे अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणी अधिक तपास पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस करत आहे.
Web Title: one sensation after the Dead body was found in the drain