Home नाशिक धक्कादायक! मध्यरात्री डोक्यात दगड घालून एकास संपविले

धक्कादायक! मध्यरात्री डोक्यात दगड घालून एकास संपविले

Breaking News | Nashik Crime: डोक्यात दगड घालून खून झाल्याची घटना समोर आल्याने एकच खळबळ.

One person was killed by a stone thrown at his head

नाशिक: शहरातील पेठ रोडवरील फुलेनगर येथील गौडवाडी परिसरात एका युवकाचा खून झाल्याची घटना घडली आहे. डोक्यात दगड घालून खून झाल्याची घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, संजय तुळशीराम सासे (वय ४०, राहणार घर न.१२८८, महालक्ष्मी चाळ, महाराण प्रताप नगर, पेठ रोड, पंचवटी) असे खून झालेल्याचे नाव आहे. सोमवार (दि.०२) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास डोक्यात घाव घालीत काही अज्ञातानी सासे यांचा खून केला.

दरम्यान, संजय सासे हा बाबागिरी करत असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी रूपाली संजय सासे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Breaking News: One person was killed by a stone thrown at his head

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here