Home अहमदनगर अहमदनगर ब्रेकिंग! पैसे देवाण-घेवाणीतून एकाचा खून

अहमदनगर ब्रेकिंग! पैसे देवाण-घेवाणीतून एकाचा खून

Breaking News | Ahmednagar: पैशाचे देवाण घेवाणीच्या कारणावरुन लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करत ठार केल्याची घटना. आली. या मारहाणीत गवजी जाधव हे जागेवरच ठार. (Murder)

One killed in money exchange

राहुरी: पैशाचे देवाण घेवाणीच्या कारणावरुन गवजी बन्सी जाधव (वय ४५ वर्षे, रा. केंदळ खुर्द. ता. राहुरी) यांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत गवजी जाधव हे जागेवरच ठार झाले. ही घटना राहुरी तालुक्यातील मानोरी येथे दि. ५ जानेवारी २०२४ रोजी दुपारी घडली आहे.

या घटनेतील मयत गवजी बन्सी जाधव यांची पत्नी जया गवजी जाधव (वय ३९ वर्षे, रा. केंदळ खुर्द, ता. राहुरी) यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. ५ जानेवारी २०२४ रोजी जया जाधव या मानोरी शिवारात खुरपणीचे काम करत होत्या. दुपारी दीड वाजे दरम्यान गवजी बन्सी जाधव यांना रायभान एकनाथ बर्डे याने लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यांना राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. अशी माहिती जया जाधव यांना मिळाली. त्यांनी ताबडतोब रुग्णालयात धाव घेतली. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गवजी जाधव यांना तपासून उपचारापूर्वीच मयत घोषित केले.

संजाबाई मच्छिंद्र पवार यांनी जया जाधव यांना सांगितले की, संजाबाई पवार व सर्जेराव अंकुश जाधव हे दोघे दुपारी त्यांच्या कामानिमित्ताने मानोरी येथे गेले होते. दीड वाजेच्या सुमारास त्यांचे काम संपवून ते मानोरी येथील रायभान एकनाथ बर्डे याचे घरासमोरुन जात असताना गवजी बन्सी जाधव यांना रायभान एकनाथ बर्डे हा त्यांचेतील पैशाचे देवाण घेवाणीवरुन लाथा बुक्क्यानी मारहान करीत होता. हा सर्व प्रकार संजाबाई पवार व सर्जेराव अंकुश जाधव यांनी समक्ष डोळ्यांनी पाहिला. यावेळी काही जणांनी गवजी जाधव यांना ताबडतोब राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र तोपर्यंत ते मयत झाले होते.

घटनेनंतर मयत गवजी बन्सी जाधव यांच्यावर शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दि. ६ जानेवारी २०२४ रोजी मयताची पत्नी जया गवजी जाधव यांनी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून रायभान एकनाथ बर्डे, रा. मानोरी, ता. राहुरी. याच्याविरुद्ध भादंवि कलम ३०२ प्रमाणे खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. घटनेनंतर राहुरी पोलीस पथकाने आरोपी रायभान एकनाथ बर्डे याला ताबडतोब ताब्यात घेऊन गजाआड केले. अगदी शुल्लक कारणावरुन बेदम मारहाण करत निर्घृण खूण करण्यात आला. खुनाच्या या घटनेमुळे मानोरी व केंदळ खुर्द परिसरात चांगलीच खळबळ उडाली. या घटनेचा पुढील तपास राहुरी येथील पोलिसांकडून सुरु आहे.

Web Title: One killed in money exchange

See also: Breaking News live,  Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation StudyCrime News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here