Ahmednagar News: तीन फूट गटारीत पडून नाका-तोंडा पाणी जाऊन एकाचा बुडून मृत्यू (Death)झाल्याची घटना.
कोपरगाव | Kopargaon: शहरातील हनुमाननगर येथील तीन फूट गटारीत पडून नाका-तोंडा पाणी जाऊन एकाचा बुडून मृत्यू झाला. सचिन गहिनीनाथ गजर (वय ३२) असे त्याचे नाव आहे. सोमवारी महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी रात्री आठ वाजेच्या सुमारास घरी जात असताना गटारीच्या पाईपलाईन मध्ये पाय अडकून ते रस्त्याकडेच्या असलेल्या गटारीत तोंडावर पडले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सचिन गजर हे बांधकाम मजूर होते. सोमवारी (दि. २) संध्याकाळी १९.५२ वाजेच्या सुमारास किराणा सामान आणण्यासाठी सचिन गजर हे जात असताना विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडत पाऊस पडत होता. त्यात लाईट गेल्याने ते गटारीत पडले. या मार्गावरून जात असताना गल्लीतील नागरिकांना गटारीत कोणीतरी पडल्याचे दिसले. त्यांनी सचिन गजर याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेले. परंतु डॉक्टरांनी तो मृत असल्याचे घोषित केले. त्यानंतर शहर पोलिसांना वर्दी दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली व पंचनामा केला. गटारीत पडल्याने गुदमरून त्यांचा मृत्यू झाल्याने अकस्मात मृत्यूची नोंद केल्याचे पोलिसांनी सांगितले.
Web Title: One death after falling into the drain
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App