Home अहिल्यानगर अहिल्यानगर: गावठी कट्टयासह एकास अटक : गुन्हा दाखल

अहिल्यानगर: गावठी कट्टयासह एकास अटक : गुन्हा दाखल

Breaking News | Ahilyanagar: स्थानिक गुन्हे शाखेने कोपरगाव येथे केलेल्या कारवाईत गावठी कट्टा बाळगणाऱ्या आरोपीला अटक.

One arrested with village knife Case registered

कोपरगाव : स्थानिक गुन्हे शाखेने कोपरगाव येथे केलेल्या कारवाईत गावठी कट्टा बाळगणाऱ्या आरोपीला अटक केली. या कारवाईमुळे शहरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सापळा रचून अभिषेक उदयनारायण सिंग (वयः २३, रा. टाकळी नाका) यास अटक केली. आरोपीच्या झडतीदरम्यान पोलिसांना ३० हजार रुपयांचे गावठी पिस्तूल आणि २०० रुपयांचे जिवंत काडतूस मिळून आले आहे. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात आर्म अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काही महिन्यांपूर्वी तलवारी बनवणाऱ्या गुप्त कारखान्यावर पोलिसांनी मोठी कारवाई केली होती. आता गावठी पिस्तुलांचे प्रकरण समोर आल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्राथमिक चौकशीत आरोपीने हे शस्त्र कुठून मिळवले, कोणत्या उद्देशाने ते बाळगले होते, याबाबत माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पोलिसांनी विशेष पथक नेमून या अवैध शस्त्रपुरवठ्याच्या मुळापर्यंत पोहोचण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title: One arrested with village knife Case registered

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here