गोदावरी नदीला पुन्हा पूर, नागरिकांना सतर्कतेचा इशारा- Godavari Flood
Godavari Flood: गंगापूर धरणातून ७ हजार ३८९ क्युसेक वेगानं गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू.
नाशिक: राज्यात अनेक भागांत मुसळधार पाउस सुरु आहे. परतीच्या पावसामुळे अनेक भागांत पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोटक्षेत्रात जोरदार पाउस सुरु आहे. पावसामुळे नागरिक हैराण झाले आहे.
गंगापूर धरणातून ७ हजार ३८९ क्युसेक वेगानं गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. या विसर्गामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. यंदाच्या मोसमात गोदावरी नदीला चौथ्यांदा पूर आला आहे
नाशिक जिल्ह्यातील नोदावरी नदीच्या किनाऱ्यालगत असलेल्या रामकुंड आणि गोदाघाट परिसरातील अनेक मंदिरं पुराच्या पाण्याखाली गेली आहेत, तर अनेक मंदिरांना पुराच्या पाण्याचा वेढा बसला आहे. गंगापूर प्रमाणेच दारणा, कडवा, पालखेड धरणांमधूनही मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे गोदावरी, दारणा, कादवा नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्ग आणखी वाढवणार असल्याची माहीती प्रशानसनाने दिली आहे.
Web Title: Once again Godavari Flood and intimation