Home अहमदनगर अहमदनगर ब्रेकिंग: पुन्हा एकदा या घाटात टायर घेऊन जाणारा ट्रक उलटला

अहमदनगर ब्रेकिंग: पुन्हा एकदा या घाटात टायर घेऊन जाणारा ट्रक उलटला

Ahmednagar Accident News:  कानिफनाथ घाटात पुन्हा एकदा एक ट्रक उलटल्याची घटना.

Once again a truck carrying tires overturned in this ghat Accident

जामखेड: २६ नोव्हेंबर रोजी एक ट्रक वळणाचा अंदाज न आल्याने उलटला असल्याची असल्याची घटना समोर आली होती. या अपघातमध्येही दोघेजण सुदैवाने वाचले होते. या घटनेला आठवडा होत नाही तोच ही दुसरी घटना समोर आली आहे. कानिफनाथ घाटात पुन्हा एकदा एक ट्रक उलटल्याची घटना आज दुपारी तीन वाजेच्या दरम्यान घडली. या अपघातात मालवाहू ट्रकचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून चालक जखमी झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भिंवडी येथून मंगळवारी रात्री आठच्या दरम्यान अपोलो कंपनीचे टायर घेऊन ट्रक (क्रमांक एम. एच ४६, बी.बी. ९४७१) हैदराबादला चालला होता. बुधवारी दुपारी बीड-नगर राज्य महामार्गावरील आष्टी तालुक्यातील कानिफनाथ घाटात वळणाचा अंदाज न आल्याने चालकाचा ताबा सुटून ट्रक उलटला. नशिब बलवत्तर म्हणून चालक संतोष विश्वास खाडे (रा. धनेगाव ता. देवणी. जि. लातुर) याचा जीव वाचला. चालक जखमी झाला असून ट्रकचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या घाटात उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.

Web Title: Once again a truck carrying tires overturned in this ghat Accident

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here