Home अहिल्यानगर पोलीस पाहताच तरुणाने पेट्रोल टाकून घेतले पेटवून

पोलीस पाहताच तरुणाने पेट्रोल टाकून घेतले पेटवून

Ahmednagar News:  तरुणाने पोलिसांना पहाताच त्याच्या कारवाईच्या धास्तीने वर्क्स शॉपमध्ये जावून स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून (Fire) घेतले.

On seeing the police, the young man threw petrol and set it on fire

श्रीरामपूर: तालुक्यातील दत्तनगर येथे एका तरुणावर फसवणूकीसारखे गुन्हे दाखल असून यातील एका गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस दत्तनगर येथे त्याच्या वेल्डींग वर्क्सच्या दुकानाच्या तेथे आले असता त्या तरुणाने पोलिसांना पहाताच त्याच्या कारवाईच्या धास्तीने वर्क्स शॉपमध्ये जावून स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेतले. त्यास तातडीने लोणीत उपचारासाठी पाठवविले आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. त्यामुळे पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली आहे.

पैसे घेवून लग्न लावून दिले व त्यांना फसविण्याच्या अनेक घटना घडल्या. त्याप्रकरणी राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्याचपध्दतीने एक गुन्हा दत्तनगर येथील जाकीर बबन पठारे या तरुणाविरुध्द जालना जिल्ह्यातील गौंडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी गौडी पोलीस ठाण्यात  पोलिसांचे पथक काल दत्तनगर येथे आले होते.

जॉन घरी नसल्याने पोलिसांनी जॉनच्या आईसह अन्य लोकांना पोलीस स्टेशनमध्ये ताब्यात घेतले. आरोपी जॉनला याबाबत माहिती समजली त्याने तत्काळ पोलिसासोबत दुरध्वनीच्या माध्यमातून संपर्क केला आणि घरच्यांना सोडून द्या मी पोलीस ठाण्यात  शरण येतो असे वारंवार सांगितले मात्र पोलिसांकडून सदर घटनेबाबत कानाडोळा केल्याने पठारेने रागाच्या भरात दत्तनगर पोलीस चौकीच्या समोरील बाजूस स्वतःला पेटवून घेतले.

या पोलिसांना पहाताच या गुन्ह्यातील संशयित आरोपी जाकीर बबन पठारे या तरुणाने ग्रामपंचायत शेजारीच असलेले त्याचे वेल्डींग वर्क्सच्या दुकानाच्या आत जावून अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेतले. त्याला वाचविण्यासाठी सर्वजण धावपळ करु लागले. तो यातगंभीर जखमी झाला होता. त्यास तातडीने लोणी येथील प्रवरा ट्रस्ट ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याला उपचारासाठी नेण्यासाठी पोलिसांनी मोठी धावपळ उडाली.

Web Title: On seeing the police, the young man threw petrol and set it on fire

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here