Home अहमदनगर नगर जिल्ह्यात चिंतेचे वातावरण: परदेशातून जिल्ह्यात आलेल्या १३ प्रवाशांचा शोध सुरु

नगर जिल्ह्यात चिंतेचे वातावरण: परदेशातून जिल्ह्यात आलेल्या १३ प्रवाशांचा शोध सुरु

Omicron Search for 13 passengers from abroad started in Ahmednagar

अहमदनगर |  Omicron | Ahmednagar: ओमिक्रॉनच्या (Omicron) व्हायरस पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय प्रवास करून आलेल्या व्यक्तींचा  शोध घेऊन त्यांची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील १५ जण आंतरराष्ट्रीय प्रवास करून आल्याची माहिती प्रशासनाला मिळाली आहे. त्यामधील  नगर शहरात आलेल्या दोन जणांचा शोध घेण्यात आला  असून त्यांची चाचणीही करण्यात आली. त्यांचा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. मात्र, तरीही नियमानुसार त्यांना १४ दिवस विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. ग्रामीण भागात आलेल्या इतर प्रवाशांचा शोध सुरू करण्यात आला आहे, त्यांची चाचणी होईपर्यंत जिल्ह्याची चिंता वाढली आहे.

जिल्ह्यात आलेल्या १५ जणांपैकी अहमदनगर शहर आणि कोपरगावातील प्रत्येकी २, राहाता आणि राहुरी येथील प्रत्येकी ३ , श्रीरामपूरमधील ४ आणि संगमनेरमधील १ , असे १५ जण आहेत. नगर शहरात आलेल्यांपैकी एक जण ब्रिटन आणि दुसरा अमेरिकेतून आलेला आहे. त्या दोघांचेही अहवाल निगेटिव्ह असल्याने नगर शहरात चिंतेचे कारण नाही. मात्र, जिल्ह्यातील अन्य प्रवाशांचा शोध सुरू आहे. जिल्हा आरोग्य विभागाकडून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

Web Title: Omicron Search for 13 passengers from abroad started in Ahmednagar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here