ब्रेकिंग: महाराष्ट्रात सापडला आणखी एक ओमिक्रोनचा रुग्ण
मुंबई | Omicron: महाराष्ट्रात सध्या असणाऱ्या ओमिक्रॉन व्हेरियंटबाबतची चिंता व्यक्त होत असताना आता आणखी एका रुग्णाची भर पडली आहे. त्याच्या संपर्कातील व्यक्तींचे अहवाल अजून येणे बाकी आहे. कारण धारावीमध्ये ओमिक्रॉनबाबतचे एक रुग्ण आढळून आला आहे.
मुंबईमधील धारावीमध्ये एक व्यक्ती ओमिक्रॉन (Omicron) व्हेरियंटने संक्रमित झाला असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतची माहिती देताना बीएमसीने म्हटलंय की, टांझानियामधून हा व्यक्ती परतला होता. सध्या या रुग्णाला सेवनहिल्स हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आलं आहे. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी झाली असून त्यांचा अहवाल येणे बाकी आहे. आतापर्यंत ओमिक्रॉनबाधित रुग्णांची महाराष्ट्रातील संख्या ही अकरा झाली आहे.
Web Title: Omicron another one patient in Maharashtra