Home अहमदनगर अहमदनगर: महाविद्यालयीन तरुणीवर  मैत्रिणीच्या भावाने केला अत्याचार , व्हिडीओ व्हायरलची धमकी

अहमदनगर: महाविद्यालयीन तरुणीवर  मैत्रिणीच्या भावाने केला अत्याचार , व्हिडीओ व्हायरलची धमकी

Ahmednagar | Shrirampur: प्रेम असल्याचे सांगत अत्याचार,  छायाचित्रे व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार.  

college girl was abused by her friend's brother, the video went viral

श्रीरामपूर: शहरातील एका १८ वर्षांच्या महाविद्यालयीन तरुणीनवार तिच्या मैत्रिणीच्या भावाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.  तिचे बळजबरीने छायाचित्रे व व्हिडीओ काढत ते प्रसारित करण्याची धमकी आरोपीने दिली. याप्रकरणी शहर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

दानिश मन्सुरी असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. मैत्रिणीच्या घरी बारावीच्या परीक्षेचे मागील वर्षांचे प्रश्नपत्रिका संच घेण्यासाठी तरूणी गेली असता आरोपी दानिश याने तरुणीवर बळजबरीने लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. तिच्यावर प्रेम असल्याचे सांगत अत्याचार केला.

आरोपी हा महाविद्यालयात पुढच्या वर्गात शिक्षण घेतो. मैत्रिणीचा भाऊ असल्यामुळे त्याच्याशी ओळख होती. त्याचाच आरोपीने गैरफायदा घेतला. तरुणीला छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यातून घरी भेटायला येण्याचे सांगत अनेकदा अत्याचार केले. बदनामीच्या भीतीने तरुणीने याबाबतची कुटुंबीयांना माहिती दिली.

शनिवारी (दि. २५) आरोपी दानिश याने तरुणीला फोन करून हॉटेलमध्ये भेटायला येण्याची गळ घातली. अन्यथा छायाचित्रे व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. तेथे तिचा विनयभंग करण्यात आला. अखेर त्रास असह्य झाल्याने तिने कुटुंबीयांना सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर गुन्हा दाखल झाला. पोलिस उपअधीक्षक डॉ. बसवराज शिवपुंजे व निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी घटनास्थळी भेट दिली.

Web Title: college girl was abused by her friend’s brother, the video went viral

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here