जलयुक्त शिवार योजनेच्या भ्रष्टाचार प्रकरणी तीन अधिकार्यांना आज अटक
Ahmednagar | अहमदनगर: सन 2015-16 साली कर्जत तालुक्यात झालेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या भ्रष्टाचार प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले. या भ्रष्टाचार प्रकरणी अहमदनगरच्या लाचलुचपत (एसीबी) विभागाने अहमदनगर वनविभागाच्या तीन अधिकार्यांना आज अटक (Arrested) केली आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर वृषीकेत पाटील, वनरक्षक बलभीम राजाराम गांगर्डे व वनरक्षक शेखर रमेश पाटोळे अशी अटक केलेल्या अधिकार्यांची नावे आहेत.
दरम्यान या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून या दोन्ही गुन्ह्यात पाच आरोपी आहेत. यातील तिघांना अटक केली असून तत्कालीन वनसंरक्षक रमेश गोविंद गोलाकर व एक महिला वनपाल पल्लवी सुरेश जगताप पसार आहे.
Web Title: officials arrested in corruption case of Jalayukta Shivar Yojana today