Home कोपरगाव ऑफिस बॉयनेच दिली मालकाची सुपारी; कोपरगावमधील टोळी जेरबंद

ऑफिस बॉयनेच दिली मालकाची सुपारी; कोपरगावमधील टोळी जेरबंद

Breaking News | Nashik Crime: सिमेंटमालकाला लुटण्यासाठी साथीदारांना सुपारी देणार्‍या ऑफिस बॉय आणि त्याच्या पाच जणांच्या टोळीला गंगापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि डम्प डाटाच्या आधारे गजाआड.

office boy who gave the owner's betel nut; Gang jailed in Kopargaon

नाशिक: सिमेंटमालकाला लुटण्यासाठी साथीदारांना सुपारी देणार्‍या ऑफिस बॉय आणि त्याच्या पाच जणांच्या टोळीला गंगापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि डम्प डाटाच्या आधारे गजाआड केले आहे. यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश असून, तीन जण रेकॉर्डवरील आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की,ऑफिस बॉय जयेश चंद्रकुमार वाघ (रा.पाईपलाईन रोड, गंगापूररोड, नाशिक) उदय राजेंद्र घाडगे (२८, रा. मोनाली अपार्टमेंट, पंचवटी इलाईट हॉटेलमागे, त्र्यंबकेश्वर रोड, नाशिक, मूळ रा. कोपरगाव, जि. अहमदनगर), रोहित किशोर लोहिया, (तिघेही रा. कोपरगाव, जि. अहमदनगर), विराज कैलास कानडे , संकेत किशोर मंडलिक अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. सिमेंट व्यावसायिक शारिक शेख, दीपक खताळे व ऑफिस बॉय जयेश वाघ हे कारने महात्मानगर पाण्याच्या टाकीजवळ १७ ऑगस्ट २०२४ रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास आले. ते दिवसभरात झालेल्या व्यवसायाची रक्कम दोन लाख रूपये घेऊन त्यांच्या डाक सेवा मंडळ बिल्डींगमधील ऑफिसजवळ होते.

यावेळी शारीक शेख व दीपक खताळे हे रक्कम घेऊन कारमधून खाली उतरले. ऑफिस बॉय जयेश वाघ कार पार्क करत होता. त्यावेळी शारीक शेख व दीपक खताळे यांच्यावर चार अनोळखी युवकांनी चाकू, लाकडी दांडा व मिरची पावडरने हल्ला केला. संशयितांनी खताळे यांच्या हातातील पैशाची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला केला. त्यावेळी शेख व खताळे यांनी हल्ला करणार्‍यांना प्रतिकार केला असता संशयितांनी खताळे यांच्या डोक्यावर वार केले. त्यात ते जखमी झाले. त्यानंतर संशयितांनी शेख यांच्यावरही चाकू हल्ला केला. खताळे व शेख हे रोख रक्कम घेऊन शेजारच्या बिल्डींगच्या पार्किंगमध्ये पळाले असता हल्लेखोरांचा डाव फसला. यानंतर संशयित दुचाकीवरून पळून गेले.

Web Title: office boy who gave the owner’s betel nut; Gang jailed in Kopargaon

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here