बाळ ज. बोठे याच्या अडचणीत वाढ: बोठे विरोधात विनयभंगाचा गुन्हा
अहमदनगर | Baal Bothe: रेखा जरे खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे फरार आहे याचा शोध घेत असताना गेल्या अडीच वर्षापासून फरार असलेला आरोपी डॉ. निलेश शेळके पोलिसांना पुणे येथे सापडला आहे. यांनतर या प्रकरणात आणखी वेगळे वळण आले आहे.
एका विवाहित महिलेने पत्रकार बाळ बोठे यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्याच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. पत्रकार बोठे याने राहत्या घरी येऊन लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचे फिर्यादीत या महिलेने म्हंटले आहे.
दरम्यान रेखा जरे यांची जातेगाव फाट्यावर गळा चिरून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणात बाळ बोठे यांनी सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. मात्र बोठे हा २५ दिवसांपासून फरार असून पोलीस त्याच्या मागावर आहेत. या प्रकरणाची पोलीस कसून चौकशी करत आहे.
Web Title: Offense of molestation against Bal Bothe