राजूर: सर्वोदयातील विद्यार्थी नेपाळ येथे होणाऱ्या इंडो नेपाळ इंटरनॅशनल चॅम्पियनशिपसाठी रवाना
Rajur News: नेपाळ येथे होणाऱ्या इंडो नेपाळ इंटरनॅशनल चॅम्पियनशिप साठी 19 वर्षाखालील मुलांच्या गटात निवड.
राजुर: राजूर येथील गुरुवर्य रा. वि. पाटणकर सर्वोदय विद्यामंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय या विद्यालयातील तेजस लोटे, रितेश माचरेकर, अनिकेत देशमुख, लोकेश मुर्तडकर, वैभव कोंढार या विद्यार्थ्यांनी इंडियन पॅसिफिक स्पोर्ट्स असोसिएशन या संघटनेमार्फत मथुरा दिल्ली येथे झालेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत सहभाग घेतला, त्यातून तेजस लोटे, अनिकेत देशमुख, लोकेश मुर्तडकर या तीन विद्यार्थ्यांची दिनांक पाच एप्रिल ते आठ एप्रिल 2023 या दरम्यान नेपाळ येथे होणाऱ्या इंडो नेपाळ इंटरनॅशनल चॅम्पियनशिप साठी 19 वर्षाखालील मुलांच्या गटात निवड झाली. या स्पर्धेसाठी विद्यार्थी नेपाळ येथे रवाना झाले आहे.
या स्पर्धेसाठी सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष अॅड.एम.एन. देशमुख, सचिव टी.एन. कानवडे, कोषाध्यक्ष विवेकजी मदन, संस्था सर्व संचालक मंडळ, प्राचार्य एम.डी. लेंडे, उपप्राचार्य बी.एन. ताजणे, पर्यवेक्षक एम.बी. मोखरे आदी सर्व शिक्षकांनी शुभेच्छा दिल्या. या विद्यार्थ्यांना सुनील शिंदे, भारत भोसले, बी. के. बनकर, प्रा. विनोद तारू व जे. आर. आरोटे या शिक्षकांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
Web Title: Off to Indo Nepal International Championship to be held in Nepal
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App