Home महाराष्ट्र अनैतिक संबंधात अडसर ठरला, बायकोने प्रियकराच्या मदतीनेच काढला काटा

अनैतिक संबंधात अडसर ठरला, बायकोने प्रियकराच्या मदतीनेच काढला काटा

Breaking News: अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने काटा काढल्याची घटना.

Obstructed in an immoral relationship, the wife removed the thorn

रत्नागिरी : रत्नागिरीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने काटा काढल्याची घटना घडली आहे. निलेश बाक्कर असे या घटनेतील मयत नवऱ्याचे नाव आहे. या प्रकरणात निलेशला फसवून निर्जनस्थळी नेण्यात आले होते, त्यानंतर दारू पाजून त्याची हत्या करण्याल आली. या हत्येनंतर त्याचा मृतदेह फेकून देण्यात आला होता. या घटनेने रत्नागिरीत खळबळ उडाली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली गिम्हवणे गावात निलेश बाक्कर यांचा सलूनचा व्यवसाय होता. मात्र ते सोमवारीपासून बेपत्ता होते. त्यामुळे निलेश यांच्या भावाने आपला भाऊ बेपत्ता झाल्याची फिर्याद दापोली पोलीस स्थानकात दिली होती. त्यानुसार दापोली पोलिसांनी पत्नीकडे चौकशी केली असता तिच्या जबाबात तफावत आढळून आली. पोलिसांनी नेहा बाक्कर ज्या हॉटेलमध्ये कामाला होत्या, त्या हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता ते दोघेजण हॉटेलमधून बाहेर पडत असल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला.

एका बियर शॉपीवर नेहाने बियर घेतल्याचे सुद्धा सीसीटीव्ही मध्ये दिसून आले, आपल्याच नवऱ्याला प्रियकराच्या मदतीने दारू पाजून खून केला असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यानंतर हा मृतदेह विहिरीत फेकला.मृतदेह पालगड पाटील वाडीतून दापोली रुग्णालयात या आणण्यात आला.

संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतलेला मंगेश चिंचघरकर हा बस चालक आहे. मंडणगड डेपोची बस दापोलीला वस्तीला घेऊन आला असता, त्याला दापोली पोलिसांनी सापळा रचून पकडले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. संशयित आरोपी म्हणून पत्नी नेहा निलेश बाक्कर व तिचा प्रियकर मंगेश चिंचघरकर याला दापोली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

Web Title: Obstructed in an immoral relationship, the wife removed the thorn

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here