नॉट रिचेबल शुभांगी पाटील अखेर समोर आल्या, सांगितले राजकारण
Nashik division graduate constituency: शुभांगी पाटील यांनी आपली उमेदवारी कायम केल्यामुळे आता नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष शुभांगी पाटील आणि अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्यातच सामना रंगणार.
Nashik Shubhangi Patil: नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत रोज नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी या मतदारसंघात कॉंग्रेसचे अधिकृत उमेदवार सुधीर तांबे यांनी अर्ज न भरताच मुलासाठी माघार घेतली. तर सत्यजित तांबे यांनी या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला. घडलेल्या प्रकारामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. त्यानंतर भाजपानेही या जागेवर कुणीही उमेदवार दिला नाही. त्यातच, सकाळपासून नॉट रिचेबल असलेल्या अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi patil) यांनी परत येत, आपली उमेदवारी कायम असल्याचं म्हटलं आहे.
नाशिक पदवीधरची जागा कोण लढवणार यावर अद्यापही मविआत गोंधळ सुरू आहे. त्यात नाशिकमध्ये अपक्ष म्हणून फॉर्म भरलेल्या शुभांगी पाटील यांनी ठाकरेंची भेट घेत ठाकरेंचा पाठिंबा असल्याचं सांगितले होते. परंतु अर्ज मागे घेण्याच्या दिवशी शुभांगी पाटील नॉट रिचेबल होत्या. सकाळपासून नॉट रिचेबल असलेल्या उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi patil) दुपारी विभागीय आयुक्त कार्यलयात दाखल झाल्या आहेत. तसेच, आपण आपल्या उमेद्वारीवर कायम असल्याचे शुभांगी पाटील यांनी स्पष्ट केले.
मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आशीर्वाद घेतला असून येत्या काळात धनशक्ती की जनशक्तीचा विजय होतो ते कळेल. मी माझ्या उमेदवारीवर कायम माझ्यावर कोणाचाही दबाव नाही, असेही त्यांनी म्हटले. सकाळपासून नॉट रिचेबल राहण्यामागचे कारण वेळ आल्यावर सांगेल. महाविकास आघाडीवर मला पूर्ण विश्वास आहे, उद्धव ठाकरे नाना पटोलेंसह सर्वच पक्षश्रेष्ठींवर पूर्णपणे विश्वास असल्याचंही पाटील यांनी यावेळी बोलून दाखवलं.
दरम्यान, अपक्ष उमेदवार धनराज विसपुतेंनी घेतली फडणवीसांची भेट धनराज विसपुते यांनीही रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. १ तास आमची चर्चा झाली. या भेटीत विसपुतेंनी भाजपाकडे पाठिंबा मागितला आहे. त्यामुळे, या निवडणुकीत अधिकच रंगत आली आहे. शुभांगी पाटील यांना अधिकृतपणे ठाकरे गटाचा पाठिंबा मिळाला नाही असा दावा नाशिकचे दुसरे अपक्ष उमेदवार सुभाष जंगले यांनी केला आहे. सुभाष जंगले यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. जंगले हे ठाकरे गटाचे कार्यकर्ते आहेत.
शुभांगी पाटील यांनी आपली उमेदवारी कायम केल्यामुळे आता नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष शुभांगी पाटील आणि अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांच्यातच सामना रंगणार असंच दिसतंय. शुभांगी पाटील या भाजपाकडून निवडणूक लढवण्यात इच्छुक होत्या. परंतु भाजपाने उमेदवारीबाबत सस्पेन्स ठेवल्यानं त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला.
Web Title: Not Reachable Shubhangi Patil came forward, told the political of the election of nashik MLC
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App