Home जळगाव आई-बाबा माफ करा, मला चांगला जॉब नाही, चिठ्ठी लिहून निलेशचं टोकाचं पाऊल

आई-बाबा माफ करा, मला चांगला जॉब नाही, चिठ्ठी लिहून निलेशचं टोकाचं पाऊल

Breaking News | Jalgaon:  चांगली नोकरी मिळत नसल्याने निराश झालेल्या २५ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना.

not get a job, committed suicide by hanging himself

जळगाव : चांगली नोकरी मिळत नसल्याने निराश झालेल्या २५ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी आई-वडिलांना चिठ्ठी लिहून ”मम्मी-पप्पा मला माफ करा. मी तुम्हाला सोडून जात आहे”, असं लिहून त्याने आत्महत्या केली आहे.

खूप प्रयत्न करूनही चांगले नोकरी मिळत नसल्याने निराश झालेला निलेश सुरेश सोनवणे (वय २५, रा. आयोध्या नगर जळगाव) या तरुणाने घरात एकटा असताना घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना मंगळवारी मध्यरात्री घडली असून आत्महत्यापूर्वी त्याने सुसाईड नोट देखील लिहून ठेवली होती. त्यात त्याने लिहिले होते की, ”मम्मी-पप्पा तुम्ही मला खूप प्रेम दिले. प्लिज मला माफ करा मी तुम्हाला सोडून जातोय”, असा भावनिक उल्लेखही त्याने त्यात केला आहे.

पदव्युत्तरपर्यंत शिक्षण झालेला निलेश सोनवणे हा तरुण आई-वडील आणि मोठ्या भावासह अयोध्या नगर येथे वास्तव्यास होता. त्याने चांगली नोकरी मिळावी म्हणून अनेक ठिकाणी अर्ज देखील दाखल केले होते. मात्र चांगली नोकरी मिळत नसल्याने तो अनेक दिवसांपासून तणावात होता. मंगळवारी ९ जुलै रोजी त्याचे आई-वडील आणि भाऊ हे लग्नासाठी इगतपुरीला गेले होते. त्यावेळी निलेश हा घरामध्ये एकटाच होता आणि त्याने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. रात्री १० वाजता त्याचे मित्र घरी पोहोचल्यानंतर निलेश हा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. मित्रांनी तात्काळ एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती कळवली. घटनेची माहिती आई-वडील आणि मोठ्या भावाला कळताच त्यांनी ग्रामीण रुग्णालयामध्ये धाव घेतली. निलेशचा मृतदेह बघून आई वडलांसह मोठ्या भावाने हंबरडा फोडला. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: not get a job, committed suicide by hanging himself

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here