पाथर्डीत उत्तर महाराष्ट्र केसरीचा थरार, याने पटकावली मानाची गदा
पाथर्डी | Ahmednagar: कोरोना कमी होऊ लागल्याने पुन्हा एकदा कुस्त्यांचे फड रंगात आले आहेत. राज्यात विविध ठिकाणी कुस्त्या पार पडत आहेत. नुकताच उत्तर महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली. यामध्ये अहमदनगर येथील सुदर्शन महादेव कोतकर याने महाराष्ट्र केसरी किताब मिळविला आहे.
कोरोना पार्श्वभूमीवर बंद कुस्त्या स्पर्धा सुरु झाल्या आहेत. पाथर्डीत दोन वर्षानंतर मोठ्या कुस्तीचे आयोजन करण्यात आले. अहमदनगर कुस्तीगीर परिषद आणि केदारेश्वर सहकारी साखर कारखाना यांच्या पुढाकाराने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत उत्तर महाराष्ट्रातील ३०० मल्लांनी सहभाग दर्शविला.
या स्पर्धेत अंतिम लढत सुदर्शन कोतकर आणि नाशिक येथील बाळू बोडखे यांच्यात तब्बल ४० मिनिटे सामना रंगला. अखेर नगरच्या सुदर्शनने बाजी मारली. सुदर्शन कोतकरने बाळू बोडखेवर मात करत चांदीची गदा आणि ५१ हजाराचे पारितोषिक पटकाविले. या स्पर्धेत नगर येथील अनिल ब्राम्हणे याने तिसरा क्रमांक पटकाविला.
महत्वाचे: संगमनेर अकोले न्यूज नवीन सुपर फास्ट स्वरूपात आजच आपला अॅप येथून अपडेट करा. संगमनेर अकोले न्यूज
Web Title: North Maharashtra saffron thrill in Pathardi Ahmednagar