नितीश कुमारांना पंतप्रधानपदाच्या ऑफरची चर्चा, शरद पवार काय म्हणाले?
Breaking News | Lok Sabha Election 20124: भाजपचा विजयरथ यंदा 240 जागांवर रोखला.
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या मंगळवारी जाहीर झालेल्या निकालात 400 पारची भाषा करणाऱ्या भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मोठा झटका बसला. गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये स्वबळावर 272 ची मॅजिक फिगर गाठणाऱ्या भाजपचा विजयरथ यंदा 240 जागांवर रोखला गेला. त्यामुळे आता सत्तास्थापनेसाठी भाजपला मित्रपक्षांची मदत लागणार आहे. या पार्श्वभूमीवर सध्या दिल्लीत वेगवान राजकीय घडामोडी सुरु आहेत. इंडिया आघाडीच्या गोटातून सध्या एनडीएचा भाग असणाऱ्या नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्याशी संपर्क साधण्यात आल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत भाष्य केले.
आज इंडिया आघाडीची दुसरी बैठक आहे. गेल्या बैठकीत अनेक नेते उपस्थित नसल्यामुळे फारशी चर्चा झाली नव्हती. आता या दुसऱ्या बैठकीत पुढची रणनीती निश्चित केली जाईल. इंडिया आघाडीचा नेता कोण असेल, पंतप्रधान कोण असेल,यावर आता चर्चा करणे योग्य नाही, असे शरद पवार यांनी म्हटले. या बैठकीला सगळ्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. केंद्रात सत्तास्थापनेबाबत संख्याबळ बघून निर्णय घेतला पाहिजे. संख्याबळाकडे दुर्लक्ष करण्यात अर्थ नाही, असे शरद पवार यांनी म्हटले.
नितीश कुमारांना पंतप्रधानपदाची ऑफर दिली का? काय म्हणाले शरद पवार..
लोकसभेच्या निकालानंतर इंडिया आघाडीने नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरु असल्याची चर्चा सुरु आहे. याबाबत शरद पवारांना विचारले असता त्यांनी म्हटले की, मला याबाबत काही माहिती नाही. पण मी पेपरात वाचले की, नितीशकुमार यांनी आपण एनडीएतच राहणार असल्याचे सांगितले. ते मी वाचलं, असे शरद पवार यांनी म्हटले. तसेच चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्याशी चर्चा केल्याचे वृत्तही शरद पवार यांनी फेटाळले. इंडिया आघाडीच्या बैठकीत जे काही ठरेल, त्यानुसार आम्ही पुढे वाटचाल करु, असे शरद पवार यांनी सांगितले.
Web Title: Nitish Kumar’s offer of Prime Ministership discussed?
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study