Home अकोले अकोले: निळवंडे कालवे प्रश्नी आजपासून प्रकल्पग्रस्तांचे धरणे आंदोलन: यशवंतराव आभाळे

अकोले: निळवंडे कालवे प्रश्नी आजपासून प्रकल्पग्रस्तांचे धरणे आंदोलन: यशवंतराव आभाळे

अकोले: अनेक वर्षापासून कालव्यांच्या प्रश्नानावर अनेक निवेदने, मोर्चे, विनंत्या करून शासनाने कोणताही मार्ग काढलेला नाही. शुक्रवार दिनांक ७ जुन रोजी इंदोरी फाटा येथे जनआंदोलन करून सरकारकडून सदर आंदोलनाची दखल घेतलेली नाही. केवळ निवेदन स्वीकारण्याची औपचारिकता दाखवून वेळ निभावून नेली. त्यामुळे आमच्या प्रश्नांची सोडवणूक होत नाही तोपर्यंत रविवार दिनांक ९ जूनपासून धरणस्थळावर धरणे आंदोलन व बैठा सत्याग्रह करणार असल्याची माहिती अकोले तालुका कालावेग्रस्त व प्रकल्पग्रस्त कृती समितीच्या वतीने यशवंतराव आभाळे यांनी दिली.

याबाबतचे निवेदन तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले असून त्या निवेदनामध्ये निळवंडे धरणाची मुख्य कालवे तालुक्याच्या हद्दीपर्यंत बंदिस्त पाईपमधून व्हावेत. तसेच धरणग्रस्तांचे व प्रकल्प ग्रस्तांचे अनेक पप्रश्न प्रलाम्भित असून त्यासाठी अनेक वर्षापासून कालव्यांच्या प्रश्नांवर अनेक निवेदने मोर्चे विनंत्या करून शासनाने कोणताही मार्ग काढलेला नाही. शुक्रवार दिनांक ७ जून रोजी इंदोरी फाटा येथे जनांदोलन करून सरकारकडून सदर आंदोलनाची दखल घेतलेली नाही. केवळ निवेदन स्वीकारण्याची औपचारिकता दाखवून वेळ निभावून नेली. सदर प्रश्नांबाबत मंत्री स्तरावर कोणतीही बैठक अथवा कालवे प्रश्नानाबाबत मार्ग काढण्यासाठी नियोजन दिसत नाही. प्रश्नांची जोपर्यंत सोडवणूक होत नाही तोपर्यंत कालवेग्रस्त सनदशीर मार्गाने धरण स्थळावर आंदोलन व बैठा सत्याग्रह सुरु ठेवणार असल्याचे यशवंतराव आभाळे यांनी सांगितले.   

Website Title: Nilwande canal protests from today’s protest movement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here