प्रा. निलेश वाकचौरे यांना राज्यस्तरीय कलावंत पुरस्कार प्रदान
प्रा. निलेश वाकचौरे यांना राज्यस्तरीय कलावंत पुरस्कार प्रदान
कलावंत विचार मंच व कमल फिल्म प्रोडक्शन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा राज्यस्तरीय कलावंत पुरस्कार नवोदित कवी लेखक व सर्जनशील व उपक्रमशील शिक्षक प्रा. निलेश भाऊसाहेब वाकचौरे यांना मराठी चित्रपट नाटक मालिकाचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक मा. श्री. संजय शिंदे यांच्या हस्ते आय ए एम सभागृह नाशिक येथे सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर कवीवर्य नारायण सुर्वे कवी कट्टाचे समन्वयक ज्येष्ठ कवी मा. श्री. भीमराव कोते, महर्षी चित्रपट संस्था सल्लागार मा. प्रा. सोमनाथ मुठाळ, मिसेस इंडिया आर्टिस्ट इंटरनॅशनल विजेती व मराठी व हिंदी चित्रपट, मालिका अभिनेत्री मा. शिल्पी अवस्थी, मिसेस ग्लोबल इंटरनॅशनल ब्युटी क्विन 2018 विजेत्या व मराठी व हिंदी चित्रपट, मालिका अभिनेत्री मा. नुतन मिस्री, गीतकार मा. श्री. पी. कुमार धनविजय, अखिल भारतीय मराठी साहित्य परीषदेचे मा. श्री. मुक्तानंद जगताप व आदी मान्यवर उपस्थित होते. प्रा. निलेश वाकचौरे हे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील नवलेवाडी गावचे रहिवासी असून ते सध्या श्री ब्रम्हानंद स्वामी शिक्षण प्रसारक मंडळाच्या विना अनुदानित कला व वाणिज्य महाविद्यालय दोडी बुद्रुक ता. सिन्नर जि. नाशिक येथे मराठी विषयाच्या अध्यापनाचे काम करतात. ते स्वत: शारिरीकदृष्ट्या अपंग असून व कुटुंबात अठरा विश्व दारिद्र्य अर्थात प्रतिकूल परिस्थिती असताना देखील त्यांनी उच्च शिक्षणाची कास मात्र आजवर सोडलेली नाही. शिक्षण घेत असताना त्यांनी आजूबाजूच्या जीवनातील दाहक अनुभव तसेच विदारक परिस्थितीवर भाष्य करत विविध विषयांवर कविता लेखन केले. त्यांचा आजवर ‘सरणावरची जिंदगी’ व ‘काळजीचे काळीज’ काव्यसंग्रह विविध कथा, लेख प्रकशित असून एक काव्य संग्रह येत्या जुलै मध्ये प्रकाशनाच्या वाटेवर आहे.
प्रा. निलेश वाकचौरे यांना यापूर्वी अमरावती येथील INSA चा विद्याभूषण पुरस्कार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा राज्यस्तरीय कथालेखन पुरस्कार, महाराष्ट्र राज्य विश्वकर्मा फाउंडेशनचा आदर्श युवा प्रेरणा पुरस्कार, बीड येथील राजे मल्हारराव होळकर राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार आदी पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. प्रा. वाकचौरे यांना राज्यस्तरीय कलावंत पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे परिसरात सर्वत्र अभिनंदन व कौतुक केले जात आहे.
Website Title: Nilesh Wakchaure has been conferred with state-level artist award
Latest: Sangamner News, Akole News, And Entertainment News
अहमदनगर जिल्ह्यातील No-1 अप्प: आजच Google Play Store ला जाऊन डाउनलोड करा – Sangamner Akole News.