ब्रेकिंग! निलेश लंके यांच्या पीएवर प्राणघातक हल्ला, प्रकृती चिंताजनक
Breaking News | Ahmednagar: लोकसभा निकालालानंतर दोनच दिवसानंतर म्हणजे आज (६ जून) निलेश लंके यांच्या सहकाऱ्यावर प्राणघातक हल्ला झाला.
पारनेर: नुकतंच अहमदनगर लोकसभेचा निकाल लागला व त्यात पारनेरचे निलेश लंके हे विजयी झाले. दरम्यान निकालालानंतर दोनच दिवसानंतर म्हणजे आज (६ जून) निलेश लंके यांच्या सहकाऱ्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. सहकारी राहुल झावरे याच्यावर हा हल्ला झाला असल्याचे समोर आले आहे.
या हल्ल्यानंतर राहुल झावरे यांना रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आले आहे. पारनेर तालुक्यातल्या गोरेगावमध्ये राहुल झावरे यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. विजय औटी सह आठ ते नऊ जणांनी हा हल्ला केल्याची माहिती सध्या समजत आहे. खासदार निलेश लंके यांचे राहुल झावरे हे स्विय सहाय्यक आहेत.
डॉ. कावरे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, हा हल्ला सुनियोजित असल्याने त्यांचा सहा ते सात जणांनी गळा दाबला असल्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांचा श्वास रोखला गेला होता. त्यांना सध्या सुरभी हॉस्पिटल येथे आणले असून त्यांना सध्या ऑक्सिजन सपोर्ट दिला गेला आहे.
विजय औटी सह आठ ते नऊ जणांनी केला हल्ला केला असल्याची माहिती समोर आली आहे. झावरे यांची गाडीही फोडण्यात आली. या मारहाणीत झावरे जखमी झाल्याचे वृत्त आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवले आहे.
या घटनेची माहिती मिळताच लंके समर्थक घटनास्थळी येऊ लागले होते. त्यामुळे येथे कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला गेला आहे.
लोकसभा निवडणुकीत निलेश लंके यांनी विजय मिळवल्यानंतर पारनेर तालुक्यात अंतर्गत राजकारण पेटले असल्याचे दिसते. यातूनच हे समर्थक आमनेसामने आले व राहुल झावरे यांच्यावर हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समजली आहे.
Web Title: Nilesh Lanke PA assaulted, critical condition
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study