Home अकोले सत्यनिकेतन संस्थेचे सचिव कै.रा.वि.पाटणकर यांच्या अर्धपुतळयाचे अनावरण व पुस्तिका प्रकाशनाचे आयोजन

सत्यनिकेतन संस्थेचे सचिव कै.रा.वि.पाटणकर यांच्या अर्धपुतळयाचे अनावरण व पुस्तिका प्रकाशनाचे आयोजन

राजूर(News):- समविचारी, कर्तव्यप्रवन अन ध्येयवादी व्यक्ती एकत्र आले तर काय होऊ शकते यांचे मृतीमंत उदाहरण म्हणजेच अकोले तालुक्यातील राजुर येथील सत्यनिकेतन संस्था आहे. या संस्थेचे माजी सचिव कै.रा.वि.पाटणकर यांच्या अर्धपुतळयाचे अनावरण व त्यांच्या जीवनावर आधारित पुस्तिकेचे प्रकाशन सोमवार दिनांक ३ फेब्रुवारी २०२०रोजी दुपारी ३ वाजता जेष्ठ विचारवंत डॉ.रावसाहेब कसबे यांचे शुभहस्ते तसेच सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष अॅड. मनोहरराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सत्यनिकेतन संचालक निवास प्रांगण राजुर येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड, राजुर ग्रामपंचायतीच्या सरपंच हेमलताताई पिचड,माजी आमदार वैभवराव पिचड तसेच अकोले विधानसभेचे सदस्य डॉ. किरण लहामटे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे.
तरी या कार्यक्रमासाठी सत्यनिकेतन संस्थेचे सचिव टि.एन. कानवडे, सहसचिव मिलिंद उमराणी, कोषाध्यक्ष विवेक मदन, संस्थेचे सर्व संचालक व सभासद,सत्यनिकेतन परिवारातील सर्व आजी-माजी प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, वसतिगृह, स्वाधारगृहातील कर्मचारी वृंद, पत्रकार , आजी- माजी विदयार्थी, पालक, हितचिंतक राजुर व परिसरातील सर्व ग्रामस्थ आदिंनी उपस्थित राहण्याचे आव्हान  केले आहे.
Website Title: News statue of RV Patankar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here