Home संगमनेर संगमनेर पोलीस मारहाण प्रकरणावर अखेर पडदा

संगमनेर पोलीस मारहाण प्रकरणावर अखेर पडदा

संगमनेर: पोलीस मारहाण करणाऱ्या महसूल कर्मचाऱ्यांनी पोलीस निरीक्षकाकडे दिलगिरी व्यक्त करत लेखी माफीनामा दिल्याने या प्रकरणावर पडदा पडला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, संगमनेर शहरातील तीन बत्ती चौकात बंदोबस्त आटोपून घरी जात असताना एका पोलिसाला मास्क न लावण्याच्या कारणावरून तिघा महसूल कर्मचाऱ्यांनी मारहाण केली होती. अहमदनगर पोलीस मुख्यालयात सेवेत असलेला हा पोलीस सध्या संगमनेर येथे नियुक्त आहे. मारहाण झालेल्या पोलिसाने तहसीलदार व पोलीस निरीक्षकाकडे मारहाण करणाऱ्या कर्मचारी यांच्याविरोधात तक्रार केली होती. याबबत एकही अधिकार्याने लक्ष दिले नाही. संतप्त झालेल्या या पोलीस कर्मचारी याने जिल्हा पोलीस प्रमुखांकडे तक्रार करण्याचा इशारा दिला.

त्यानंतर महुसूल कर्मचारी यांची पायाखालची वाळू सरकली. पोलिसाचा संताप पाहून महसूल खात्याच्या तीनही कर्मचारी यांनी पोलीस अधिकाऱ्यांकडे लेखी माफीनामा सादर केला. आमच्याकडून गैरसमजुतीने सदर पोलीस कर्मचारी व पोलीस प्रशासनाची माफी मागतो. असे त्यांनी माफीनाम्यात म्हंटले आहे. यांनतर पोलीस अधिकाऱ्यांनी सदर पोलिसास बोलावून माफीनामा दाखविला. यांनतर या प्रकरणावर पडदा पडला. आपणास अधिकाऱ्यांनी मोबाईलवर माफीनामा दाखविला असल्याचे या कर्मचारी यांनी सांगितले.  

Website Title: News Sangamner police beating case finally End

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here