Home अकोले राजुर येथे पाटणकरांच्या अर्धपुतळयाचे अनावरण व पुस्तिकेचे प्रकाशन सोहळा संपन्न

राजुर येथे पाटणकरांच्या अर्धपुतळयाचे अनावरण व पुस्तिकेचे प्रकाशन सोहळा संपन्न

राजूर(News): महात्मा गांधीजींनी देशाला राष्ट्रभक्तीची शिकवण दिली त्यातीलच एक थोर राष्ट्रभक्त व्यक्तीमत्व म्हणजेच कै. रा.वि. पाटणकर होते. असे प्रतिपादन जेष्ठ विचारवंत डॉ.रावसाहेब कसबे यांनी केले.

अकोले तालुक्यातील राजुर येथील सत्यनिकेत संस्थेच्या वतीने संस्थेचे माजी सचिव कै. रा.वि.पाटणकर यांच्या अर्धपुतळयाचे अनावरण व त्यांच्या जीवनावर आधारित पुस्तिकेचे प्रकाशन सोहळा नुकताच विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ विचारवंत डॉ.रावसाहेब कसबे विचारमंचावरून बोलत होते.

या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष अॅड. मनोहरराव देशमुख हे होते.

यावेळी अकोले विधानसभेचे सदस्य डॉ. किरण लहामटे,प्रा.एस. झेड.देशमुख, प्रणिलाताई दातार, शरद पाटणकर,नीलिमा पाटणकर,अंजली भिडे,मेधा मराठे,संस्थेचे सचिव टि.एन. कानवडे, सहसचिव मिलिंद उमराणी, कोषाध्यक्ष विवेक मदन, विश्वस्त प्रकाश शहा,संचालक मारूती मुठे, एम.बी. वाकचौरे, प्रकाश टाकळकर, एस.टी.एलमामे, नंदकिशोर बेल्हेकर, विजय पवार,भरत सावंत,विनय सावंत, मंगलदास भवारी,प्रा.बाबासाहेब देशमुख यांसह राजुर, खिरविरे, कातळापुर,शेणित या शाळांचे आजी- माजी प्राचार्य, मुख्याध्यापक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, वसतिगृह, स्वाधारगृहातील कर्मचारी वृंद, विदयार्थी, पालक, ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

जेष्ठ विचावंत डॉ. कसबे पुढे बोलताना म्हणाले कि,परिस्थिती प्रमाणे बदलणारी माणसे सांभाळण्यापेक्षा परिस्थिती बदलविणारी माणसे सांभाळा. आयुष्यात कधीही अपयश अनुभवायला मिळणार नाही. पाटणकरांनी शिस्त लावली. त्यात आदरयुक्त भिती होती. त्यांनी समाज, परीस्थिती बदलवली. अणवाणी पायांनी चळवळी उभारल्या त्यांच्या पायाच्या पाऊलखुणा अमर होतील. असेही गौरोद्गार डॉ. कसबे यांनी काढले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅड. मनोहरराव देशमुख यांनी रा.वि. पाटणकर हे ऋषीतुल्य व्यक्तीमत्व असुन त्यांच्या आशिर्वादानेच संस्था चालली आहे. त्यांची तत्त्वप्रणाली जपुन शिक्षण अधिक समृद्ध व्हावेत.असे विचार प्रतिपादीत करुन सचिव टि. एन. कानवडे यांच्या कार्याचे कौतुक केले.

आमदार डॉ. किरण लहामटे यांनी रा.वि. पाटणकर नसते तर आम्ही घडलो नसतो. म्हणुन त्यांच्या दर्शनाने त्यांच्या कार्याची जाणीव पदोपदी होईल व ती शेवट पर्यंत राहील. तसेच विठ्ठल शेवाळे यांचे पुस्तक आजच्या पिढीला प्रेरणायी असल्याचे प्रतिपादन केले.

यावेळी प्रा.एस.झेड.देशमुख,प्रमिलाताई दातार, शरद पाटणकर, मृदुला पाटणकर यांनीही पाटणकरांना फणसाची उपमा देऊन त्यांचे कार्याच्या गौरोद्गाराचे वर्णन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव टि.एन. कानवडे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संतराम बारवकर यांनी केले तर सहसचिव मिलिंद उमराणी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Website Title: News R V Patankar Statue and Book publishing ceremony

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here